Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मानवी दैनंदिन जीवनाला...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मानवी दैनंदिन जीवनाला घातक वेबसाईट वर बंदी कायदा आवश्यक.

मानवी दैनंदिन जीवनाला घातक वेबसाईट वर बंदी कायदा आवश्यक.
ads images

झरी (प्रतिनिधी):-  तालुक्यातीलच नाही तर राज्यात मानवी दैनंदिन जीवनात मोबाईल आवश्यक वस्तू बनली आहे.  एकदा जेवन उशिरा करतात पन मोबाईल हाताळण्याला उशीर होत नाही. आजकाल मोबाईल वर अनेक वेबसाईट उपलब्ध आहे. काही योग्य कामाच्या तर काही घातक सूद्धा. महत्वाच सांगाच म्हणजे मनाला ज्या गोष्टीची ज्यास्त गरज असते त्या गोष्टीची सवय लागने तितकेच घातकही असते. मोबाईल छोट्या मुलांच्या हाताशी लागल्यावर बर्याच वेळा नाही त्या वेबसाईट  दिसतात. यामुळे थोडी फार मोबाईल हाताळता येणारी मुलांवर  चुक मार्गावर जाणार नाही असे म्हणता येत नाही. लाहानच काय युवक मोठी मानसे सूद्धा मोबाईल हाताळताना काही ऑपशन न समजणारे चुका करून पस्तावल्याचे अनेक प्रकरणने, तक्रारी समोर आल्या आहेत. बातम्या वृत्तपत्रातून रोज वाचतो व ऐकतो की अमुक व्यक्तीचे हजारो गडप झाल्याचे निदर्शनास आले. वेबसाइट च्या माध्यमातून झालेल्या चोर्या सायबर पोलीस लोकांना शोध घ्यायला व पकडायला उशीरच लागतो. 

कारण आपण विचारही करू शकत नाही ईतक्या वेबसाईट असल्यामुळे. त्यामुळे मानवी जीवनात आपल्या बुद्धीला घातक ठरणार्या वेबसाईट वर बंदी यावी असे ज्यस्तीत ज्यास्त लोकांचे मत आहे. ऑनलाईन प्रक्रियेत अनेक चांगल्या गोष्टी आहेत. यात काही शंका नाही. परंतु त्या सोबतच बर्याच व्यक्तीच्या बुद्धीला घातक ठरणार्या वेबसाईट सूद्धा आहे. काही ऑनलाईन गेम आहे. देशातला विचार केला तर ऑनलाईन गेम मुळे बुद्धी वर विपरीत परीणाम होऊन मरण पावल्याचे उदाहरण न्यूजच्या माध्यमातून समोर आलेले पहायला मिळाले.

 समजदार शिकलेले कम्प्युटर सरर्टफिकेट मिळविलेले कशेबशे काही वेबसाईटवर काम करू शकतात पन बर्याच व्यक्तिंना वेबसाईटचे ज्ञान नसतात तरी कम्प्युटर, ॲंड्राॅईड मोबाईल वापरताना दिसतात. अशा व्यक्तींचे घातक वेबसाईट मुळे नुकसान नाकारता येत नाही. न समजल्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करून पाहतात. त्यामध्ये त्यांच्या मनाला लूभावनार्या मार्गदर्शनामुळे, चित्रांमुळे वेब लिंक ओपन करतात व त्यावर कार्य करून स्वताचे नुकसान करून बसतात. असे हजारो उदाहरण आहे. 

काहींनी तक्रार केल्याने निदर्शनास आले. काही तक्रारींचे निवारण झाले तर काहीचा थांग पत्ता अजूनही लागलेला नाही.भारतात सायबर अटॅक मुळे मोठमोठ्या बिजनेसमन, कलाकार, ऑफिसर, व्यापारी यांसाख्यांच्या अकाउंट वर डल्ला मारला गेल्याचे रोजच्या बातम्यांमधून ऐकतो. त्यामुळे माणवी दैनंदिन जीवनाला घातक अशा वेबसाईट वर बंदी कायदा आवश्यक आहे. फोन पे, गुगल पे, पे टी एम, भारत पे सारख्या  अकाउंट चा चुकीच्या  वापर पद्धतीने नुकसान झाले असल्याचे सूद्धा अनेक उदाहरणे आहेत. काही वेबसाईट तर नशा असल्यासारख्या आहे. व्यक्तीला मोह लागण्यासाख्या आहे. एकदा लिंक ओपन केल्यास अनेक ऑप्शन्स क्लिक करून पाहण्याचा मोह लागतात. मनावर विपरीत परिणाम होतो. स्वताच कारणीभूत ठरतात आणी नेमकं हेच कारण चांगल्या प्रेरणादायी विचाराला घातक ठरते. अशा कारणांमुळे मानवी दैनंदिन जीवनाला घातक वेबसाईट वर बंदी कायदा आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...