आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव (प्रतिनिधी): कुंभा येथील शिव जयंती महोत्सव युवामंच व ग्रामवासी कुंभा च्या वतीने आज श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीउत्सव साजरा करण्यात आला. महाराजांची प्रतिमा सजवून ढोल नगाडाच्या गजरात भव्य मिरवणूक कुंभा गावामध्ये काढण्यात आली.मिरवणुकीदरम्यान श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधीस्थळ शोधून सर्वप्रथम जयंतीउत्सव साजरे करणारे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले तसेच महान सेनानी बिरसा मुंडा यांना हारार्पण करून मा.सरपंच व उपसरपंच कुंभा यांच्याद्वारे पूजन करण्यात आले.
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांला सुनियोजन व योग्य व्यवस्थापन करून स्लॅब चे घर बांधून देण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न करण्यात येईल : -मा.श्री अरविंदभाऊ ठाकरे,सरपंच कुंभा
कुंभा बाजार चौकामध्ये मिरवणुकीला फराळ ,नास्ता व सरबतची व्यवस्था सुरज झोटिंग व त्याच्या सोबतील युवा सदस्यांनी चोख रित्या पार पाडली.
श्री राजे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत जात गावातील बौद्ध विहारातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री गौतम उमरे,श्री अरुण खैरे,श्री मनोहर उमरे व आदी समाजबांधव उपस्थित होते. मिरवणुकीतील ग्रामस्थांना बौद्ध विहार कमिटी कुंभा तर्फे चहा व नास्ता ची व्यवस्था करण्यात आली व या भव्य मिरवणुकीची सांगता करण्यात आली
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या भव्य मिरवणुकीचा शुभारंभाची सुरवात करण्यात आली.चौकातील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मा.सरपंच, उपसरपंच व ग्रामवासी यांनी मानवंदना दिली. श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीउत्सव या छोटेखानी कार्यक्रमात मा.अरविंदभाऊ ठाकरे ,सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संकल्पना राबवित कुंभा गावात आलेले प्रत्येक घरकुल हे खऱ्या लाभार्थ्यांलाच दिले जाईल.
नाव किंवा तोंड पाहून किंवा अतिक्रमण धारकला व संडास बांधकामाच्या अनुदानाची उचल करून न बांधणार्यांना घरकुल दिल्या जाणार नाही असे ठमकाऊन सांगितले. तसेच "गावातील प्रत्येक घरकुल स्लॅब चे बांधण्यात येईल त्यासाठी योग्य व व्यवस्थितरीत्या सुनियोजन करून स्लॅब चे घर बांधल्याशिवाय राहणार नाही" असा निर्धार मा.सरपंच अरविंदभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केला. या शुभप्रसंगी मा.सरपंच अरविंदभाऊ ठाकरे यांनी कुंभा मधील घरकुल योजनेचा शुभारंभ करीत श्रीमती दुर्गाताई बोरेकर व श्री महादेव बैजू राऊत यांच्या घरकार्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीउत्सवात प्रमुख पाहुणे मा.अरविंदभाऊ ठाकरे,सरपंच,मा.गजुभाऊ ठाकरे,उपसरपंच समस्त ग्रामपंचायत कुंभा सदस्यगण व कर्मचारी वर्ग, तसेच श्री जयवंत ठेपाले,श्री विनोदभाऊ गाऊत्रे,श्री मारोती मुप्पीडवार,श्री संदीप डुकरे,श्री मुकेश महाडुळे,श्री अनिल राऊत,श्री मयुर ठाकरे-युवासेना ता.अध्यक्ष,श्री संजय तामगाडगे,श्री अमोल वणकर,श्री दिनेश पाटील,श्री अमोल चौधरी,तसेच मा.सदस्या सौ.अस्मिता अ.ठाकरे,सौ महाजन,सौ ठेपाले ताई यांच्यासह मोठया प्रमाणात महिलावर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिक कुंभा ग्रामवासी उपस्थित होते. या जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती महोत्सव युवमंच चे पंकज वाघ,रोहित आवारी,राकेश ठाकरे व त्यांच्या युवा टीमने परिश्रम घेतले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...