Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी तालुक्यात पंतप्रधान...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी तालुक्यात पंतप्रधान आवास घरकुल योजनेमध्ये कोण पात्र कोण अपात्र, यादिच मात्र सूरू झालं सत्र.

झरी तालुक्यात पंतप्रधान आवास घरकुल योजनेमध्ये कोण पात्र कोण अपात्र, यादिच मात्र सूरू झालं सत्र.
ads images

झरी (प्रतीनिधी): झरी तालूक्यात पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याचे पहायला मिळत आहे. खास म्हणजे  निंबादेवी ग्रामपंचायत ने घरकुल यादी वर आक्षेप घेतला असल्याचे वृत्तपत्रातून निदर्शनास आले. जाहिर केलेल्या यादीत अफरातफर झाले असल्याचे निवेदन देण्यात आले आल्याचे कळते. त्याचबरोबर तालुक्यातील बर्याच ग्रामपंचायत मध्ये याद्या लावण्यात आल्या. तालुक्यातील ईतर ग्रामपंचायत मध्ये काय खर काय खोटं  आहे त्यांचं त्यांनाच माहीत.  यावर सूद्धा गावगाळ्यात चर्चा चालू झाल्याचे समजते. अनेक जन यावर आपल्या परीने मत व्यक्त करताना ऐकायला मिळत आहे. की ज्यांच्या जवळ दुचाकी , चारचाकी, व बिल्डिंग पक्के मकान आहे अशा व्यक्तींचे सूद्धा नाव घरकुल योजनेच्या यादीत सामावेश केलेला तर ते पात्र आहे काय अशी चर्चा आहे. काहींनी पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी फार्म भरून जाहीर केलेल्या यादीत सामावेश नसल्याचे समोर येत असल्याची चर्चा. या घरकुल योजनेत काही निकश लावलेले आहे. खरोखर या निकशाची अमलबजावनी होते काय हे पाहने सूद्धा गरजेचे आहे. 

लिंक वरून मिळालेले निकशाची पडताळनी कीतपत योग्य या बद्दल अजूनतरी स्पष्ट नसल्याची चर्चा आहे. यामध्ये कूटूंबातील व्यक्ती ला अन्य दुसर्या ठिकाणी कुठेही पक्के घर नसावे, दुचाकी, चारचाकी , नसावी. क्रेडिट कार्ड असल्यास ५०,००० पर्यंत खर्च मार्यादा पर्यंतच असायला हवे, एक कींवा दोन खोल्याची कच्चे भींत व छप्पर असलेल्या व्यक्तीच पात्र असेल, ज्या कुटुंबात अपंग व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडे ईतर सक्षम व्यक्ती नाही तेच पात्र असेल, ज्यांच्याकडे जमीन नाही आणि ते अनौपचारिक मजूरी करून उदरनिर्वाह करतात असेच पात्र असणार आहे. अपात्रतेच्या कुटूंबात सरकारी कर्मचारी प्रतिमहा दहा हजार कमविनारा असल्यास अपात्र ठरणार  , जे व्यवसायीक व आयकर भरणा आहे अपात्र ठरणार. कृषी उपकरने व मासेमारी बोट असल्यास अपात्र ठरणार. दारिद्रय रेषेखालील, एस सी, एस टी अशा प्रकारचे ईतरही निकश असतील तर यादी मधुन कोण पात्र व कोण अपात्र या बद्दल काय नियोजन येत्या दिवसात माहीत पडेलच या चर्चा आहे. तालुक्यातील काही ग्रामपंचायती मध्ये राजकीय द्वेष समोर ठेवून काम करताना सूद्धा आजपर्यंत पहायला मिळाले. गरीबांवर बोट ठेवून हा त्या गटाचा हा आपल्या गटाचा आशा प्रकारापाई सामान्य व्यक्ती अनेक योजनेपासून वंचित राहत आहे. अशा प्रकारा मुळे थेट सरळ बैंक खात्यात पैसे जमा होणार्या ऑनलाईन पद्धतीला गरीब, सामान्य व्यक्ती महत्व देत असल्याचे दिसते आहे. यामुळे पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे नियोजन व निकष ग्रामपंचायत कितपत योग्य पद्धतीने हाताळणार हे पाहने सूद्धा गरजेचं आहे. योजनेचा कीतीही वाजागाजा केला तरी योजनेच्या नियोजनाला सर्वात अधिक महत्व असणार असल्याच्या चर्चा तालुक्यातील लोकांमध्ये होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...