Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / शेतकऱ्यांच्या खंडित...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

शेतकऱ्यांच्या खंडित विजजोडणीसाठी आ.समिर कुणावार यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण..

शेतकऱ्यांच्या खंडित  विजजोडणीसाठी आ.समिर कुणावार यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण..

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खा.तडस, आ.भोयर, आ.आंबटकर,आ.केचे यांनी भेटी देऊन केले समर्थन..

प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): जिल्हयात विद्युत मंडळाने कुठलीही पुर्वसुचना न देता थेट रोहीत्रावरुन शेकडो बळीराजांच्या बांधावरील विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा सुरुच असून शेतकऱ्यांचा खंडित विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करण्याचे मागणीसाठी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी काल दि. १४ रोजी शेकडो भाजपा पदाधिकाऱ्यांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली.

यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच  ऊर्जामंत्री यांनाही आ.कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः भेटून शेतकऱ्यांची कैफियत मांडली असतांनासुद्धा सरकारने तथा महावितरणने या आंदोलनाला आज दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद दिला नाही.


आ.कुणावारांसह शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या या साखळी उपोषण तसेच ठिय्या आन्दोलनाला आज खासदार रामदास तडस,आ.पंकज भोयर,आ.रामदास आंबटकर,आ.दादाराव केचे,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सरिता गाखरे यांनी भेट दिली व समर्थन जाहिर केले.यावेळी त्यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मंजुर करुन तिढा सोडवावा असा आग्रह धरला.परंतु याप्रकरणी आज तरी तोडगा निघाला नाही.
     काल दुपारी १२ वाजेपासुन  सुरुवात झालेल्या या साखळी उपोषणाला भाजपा नेते रघुवीर भैय्या अहिर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट,महामंत्री किशोर दिघे,भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर,जिल्हाध्यक्ष वरुण पाठक,जेष्ठ कार्यकर्ते मिलिंद भेडें,वसंतराव आंबटकर,भाजपा महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा दुधबडे,जि.प.सभापती माधव चंदनखेड़े,मृणाल माटे, भाजपा संघटनमंत्री अविनाश देव इत्यादि उपोषणाला बसले आहेत.

वर्धा जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त काळा जिल्हा असुन सद्या शेतकरी नापिकीमुळे कर्जबाजारी झाला असतांना महावितरण व प्रशासनाने त्यांना वेठीस धरले आहे. शेतक-यांना कुठल्याही प्रकारचे देयक न देता तसेच पूर्व सुचना न देता कोरोना काळातील प्रलंबित विज देयकाची सुलतानी वसुली सुरु आहे.  शेतक-यांच्या अडचणीच्या काळामध्ये मोठी रक्कम भरण्याचा तगादा लावला जात आहे.

शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपाची विज तोडणी तात्काळ थांबवीणे,शेतक-यांचे खंडित केलेले बांधावरील विजपंपाचे विज कनेक्शन तातडीने जोडण्यात यावे,चालु हंगामात मर रोगामुळे शेतक-यांचे तुर या पिकांचे पुर्ण नुकसान झाल्याने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी,खरीप हंगाम २०२० मध्ये झालेल्या शेतक-यांच्या कापूस व सोयाबीन
हे ३३ टक्के पेक्षा जास्त झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनाम्या नुसार वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केलेले १७८ कोटी राज्य सरकारने वर्धा जिल्हातील शेतक-यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे अश्या विविध मागण्या आ.कुणावार यांनी केल्या आहेत.

उपरोक्त आंदोलनात जि. प.सदस्य शरद सहारे , रोशन चौखे, किशोर शेंडे, शुभांगी संजय डेहणे, विनोद लाखे, हिंगणघाट पस सभापती शारदा आंबटकर, समुद्रपुर पंचायत समिती सभापती सुरेखा कैलास टिपले, उपसभापती योगेश फुसे, हिंगणघाट भाजपा तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, समुद्रपूर भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहणे, प्रवीण चोरे, माजी नगराध्यक्ष प्रेम वसंतानी, गिरीश कांबळे, महामंत्री दिनेश वरटकर, महामंत्री अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे ,जि प सदस्य ज्योत्स्ना सरोदे, जि प सदस्य राणा उर्फ वीरेंद्र रणनवरे,मानस उद्योगसमुहाचे संचालक तथा शेतकरी नेते वसंतराव राऊत, पंचायत समिती सदस्य वसंतराव घुमडे, समाजसेवक सुनील डोंगरे, पंचायत समिती सदस्य गंगाधरराव कोल्हे, पस सदस्या वंदना मडावी, प स सदस्य विजय पर्बत, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष बिस्मिल्ला खान, सोनू गवळी, सौरभ पांडे, सोनू पांडे,   हिंगणघाट युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विठूभाऊ बेनीवार,  युवा मोर्चाचे कवीश्वर इंगोले, वामन चंदनखेडे,नंदोरी सरपंच संजीवनी राऊत, रोशन पांगुळ, अमोल गवळी तसेच  सर्कल मधील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, हिंगणघाट नगर परिषदेच्या आजीमाजी नगरसेविका तसेच नगरसेवक, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सरपंच व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य गण व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी  भाग घेतला.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...