वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता प्रतिनिधी :वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्रा. कु. अंकिता अरुण पिसुड्डे जळीतकांड प्रकरणातील नराधमाला जन्मठेप नव्हे, तर फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी जिल्हाअधिकारी यवतमाळ मार्फत दिलेल्या निवेदना मार्फत केली गेली आहे.
या निवेदनातून मागणी करताना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापिका कु.अंकिता अरुण पिसुड्डे हिला ३ फेब्रुवारी २०१९ ला सकाळच्या सुमारास एकतर्फी प्रेमप्रकरणातून नराधम विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते.
घडलेल्या घटनेपासून पीडितेची मृत्यूशी झुंज १० फेब्रुवारी पर्यंत सुरू होती.परंतु दुर्दैवाने १० फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास तिची झुंज अपयशी ठरली.सदर घटना घडल्यानंतर नराधमाला तत्काळ अटक सुद्धा करण्यात आली.परंतु घडलेला प्रकार हा समाजाला हादरवून सोळणारा असून सुद्धा यामध्ये नराधमाने केलेल्या कृत्यानुसार त्याला फाशीची शिक्षा व्हावी,हे पीडितेच्या परिवाराला आणि महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित होते.
सदर घटनेची पूर्तता आणि नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी,यासाठी सरकारी वकील म्हणून आ.उज्ज्वल निकम जी यांनी प्रयत्न केले.घडलेल्या दिवशीपासून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,पुरावे सादर करून सुद्धा फाशीची शिक्षा व्हावी,यासाठी मागणी केली असता,हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.बी.भागवत यांनी हा प्रकार अपवादात्मक गुन्हा नसल्याचं सांगून,नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
त्यांच्या या दिलेल्या निकालाच्या स्पष्टीकरणातून अवघा महाराष्ट्र समाधानी नसल्याचे निवेदन कर्ते यांची मागणी आहे.तसेच पीडितेला अर्धवट न्याय मिळाला.त्यामुळे या प्रकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयात चालवावा,अशी मागणी निवेदन देते वेळी क्रांतीताई राऊत(धोटे), लाला राहुत, ऍड. अमोल बोरखडे, योगेश धानोरकर, प्रशांत बोराडे आशिष महल्ले, गणेश कोसरकर, वर्षा आखरे, मोहित कटीयार, मनोज तायडे यानी निवेदन सादर केले या विषय जिल्हाअधिकारी मार्फत न्यायालय(जे महत्वाचे आहे ते)
मा.ना.श्री.उद्धव ठाकरे साहेब (मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य)
मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब
(उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य)मा.ना.श्री.दिलीप वळसे साहे(गृहराज्यमंत्री - महाराष्ट्र राज्य)याना दिले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...