Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / फेब्रुवारी महिन्यात...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

फेब्रुवारी महिन्यात शिवरात्रीची चाहूल...

फेब्रुवारी महिन्यात शिवरात्रीची चाहूल...
ads images

झरी : हिंदू संस्कृतीत देवी देवतांची पूजा अर्चना करण्यास फार महत्व. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूरदार आपापल्या परीस्थिती नुसार प्रत्येक सनाचा आनंद नेहमी घेत असतात. ईतरही सन उत्सव आहे पन फेब्रुवारी महिन्यात आलेला सन म्हणजे शिवरात्री. या शिवरात्रीला शंकर, महादेव पार्वतीची पुजा केली जाते. परंतु हा आगळा आणी वेगळा सण आहे. हा उत्सव जानेवारीत कडाक्याची थंडी संपून झाल्यावर फेब्रुवारी महिन्यात येते.

म्हणजे  हळूहळू थंडी संपन्याचा कालावधी असते. ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या उत्साहाने शिवरात्री सनाला महत्व देतात. खेड्यापाड्यात आठ पंधरा दिवस असतांनाच  शिवरात्री सण आल्याची चाहूल लागते. याच महिन्यात महादेवाचे गाणे म्हणतात, टेपरेकॉर्डर वर मजेत ऐकतात. ग्रामीण भागात खेडोपाडी शेतकरी व मजूरदार फेब्रुवारीत शिवरात्री सण साजरा करण्यात व्यस्त होते. कारण सकाळी उठताच क्षणी चिमण्यांचा चिवचिवाट कानावर पडते. त्याच वेळी मध्येच एखादा कावळा कावकाव करते. ऐन त्याच वेळी  मधूर हळूवार सुंदर कोमल आवाजात कोयल कूहू कूहू करते. हा क्षण अनुभवायला पाहिजे अद्भूत क्षण असतात. उठून बाहेर अंगणात जाताच क्षणी आकाशातून बगळ्यांचा व पोपटांचा थवा जातेच जाते. तेवढ्यातच सूर्यकिरण पिवळ्या लाल रंगात प्रकाशाला तेज करते. 

आणि त्यातच रेडिओ, टेपरेकॉर्डर मधून  शिवरात्रीच्या गाण्याला सूर्वात होते. गाण्यांत माहादेवांच्या ओव्या. तेव्हाच सगळी मंडळी महादेवाच्या गाण्यावर घूनघुनत आपापली सर्व सकाळची कामे उरकून घेतात. अशेच एकामागून एक दिवस जाऊन शिवरात्री महादेव पुजेचा दिवस येते. त्या रात्री भजन पुजन करूनच जागरन होते. त्यामुळे सकाळी उठतांना दहा विस मिनीटे उशीर होतेच होते. कारण आजी,आई, बाईच उठवते जागरणामुळे. उठल्यावर पक्षांचा मंजूळ आवाज ऐकत असतानाच रेडिओ टेपरेकॉर्डर मधून माहादेवाच्या गण्यात घूनघूनत कामे उरकवण्याला सुर्वात होते. कामे उरकताच हीरव्याकंच आंब्याचे फांद्या आणून तोरण बनवण्यात गूंग होतात. लहान मुलांची उत्साहाने तोरणाला मदत. ते तोरण घरच्या दारावर व महादेवाच्या पुजनासाठी तोरण  असते. नंतर बेल पत्री शंकर महादेवाच्या आवडीचा विषय. शेतकरी कुणाच्या तरी बांधावरून घेऊन येते. घरची लहान मुलं फूल जमा करण्यात व्यस्त होते. घरातील स्त्रिया भोजन बनवण्यात व्यस्त. 

काही कामासाठी येणार जाणार गप्पा मारल्या सूद्धा जाते. तेवढ्यातच पुजणाना वेळ झाला असल्याचा पुकार घरातुन येते.  आजुबाजुच्या घरची मंडळी बोलावून घेतात. तेव्हाच महादेवाचा फोटो लहानश्या आंब्याच्या पानाच्या  मांडवात ठेवून पूजा अर्चना नैवेद्य करतात. मुला बाळांना पुजनाचा आस्वाद घ्यायला मिळते. तेव्हा आजी, बाई  महादेवाचे गाणे म्हटले जाते. गुलाल टीका पूरूषांना , स्त्रियांना हळद कुंकू  सन्मानाने लावतात. महादेवासमोर नारळ फोडून साखर , मिठाई टाकून मिश्रन करून प्रसाद सर्वांना वाटला जातो. व हरहर महादेवाच्या गजरात उत्सव पार पडत असते. शेतकरी  घरचा कार्यक्रम संपल्यावर परीवारा सोबत एखाद्या मंदिरात जत्रेच्या ठिकाणी जातात. कारण शिवरात्री निमित्ताने बर्याच महादेव मंदिरात जत्रा भरली जाते. त्या ठिकाणी जाऊन महादेवाच्या नावाचे घरच्यांना काही ना काही घेतात. 

मुलाबाळांना खेळणी , पूगे, खेळायला मोटर गाडी, बाहुल्या, विमान, बासरी डमरू, अशा अनेक वस्तू खरेदी करतात. एवढेच नाही तर आपल्या पत्नीलाही आनंदाने कपडे आवडणार्या वस्तू खरेदी करताना पहायला मिळतात. शेतकरी व मजूरदार वर्ग आपापल्या परीस्थिती नुसार फेब्रुवारी महिन्यात शिवरात्री सणाचा आनंद मोठ्या उत्साहात लूटत असल्याचे दिसून येते.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...