Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी जामणी तालुक्यात...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी जामणी तालुक्यात विकास कामे वाढविण्यावर भर द्या -पालकमंत्री संदिपान भुमरे

झरी जामणी तालुक्यात विकास कामे वाढविण्यावर भर द्या -पालकमंत्री संदिपान भुमरे
ads images

रस्ते व पाणीपुरवठा ची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
झरी जामनी : यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी या आदिवासी तालुक्यातील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा व शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी  तालुकास्तरीय यंत्रणेने या तालुक्यातील विकास कामे वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच येथील रस्त्यांची व पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी काल मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी 2022 ला दिलेत.

झरी तहसील येथे काल पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी भेट देऊन तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहायक जिल्हाधिकारी विवेक जाॅनसन, माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा. खनिकर्म अधिकारी ओंकार सिंह भोंड, तहसीलदार जी.एम. जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना, पालकमंत्री यांनी झरी ते पाटण रस्त्याचे काम मागील दीड वर्षापासून अद्याप पूर्ण का झाले नाही याबाबत विचारणा केली. येथे मजूर संख्या वाढवून काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.

झरी तालुक्यात विहिरींची कामे , रोजगार हमी योजनेत कुशल अकुशल कामावर मजूर उपस्थिती, शासकीय योजनेतून गुरांचे गोठे बांधकाम, शाळांचे इमारत बांधकाम, पांदन रस्त्यांची कामे इत्यादी  विकास कामाचा आढावा घेतला.

या तालुक्यातील विकास कामे राबविण्यासाठी पुरेशी यंत्रणा आहे का, तहसील नगरपंचायत व इतर यंत्रणेला काय अडचणी आहेत याबाबत सुद्धा पालकमंत्री यांनी सत्य परिस्थिती जाणून घेतली.

झरी, जामणी, सालेभट्टी व दुर्गापूर व लगतच्या भागातील उन्हाळ्यातील पाणी टंचाईची परिस्थिती बघता  पाण्याचा चांगला स्रोत शोधून पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

झरी येथे क्रीडासंकुलासाठी शासकीय जागा अथवा खाजगी जागा घेऊन क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्याची चाचपणी करण्यासही त्यांनी सांगितले. शेततळे, सार्वजनिक विहिरी, पशुसंवर्धनाची कामे वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पालकमंत्री यांनी आज चीचघाट येथील शासकीय आश्रम शाळा व शाळेच्या क्रीडा संकुलाच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच मुकुटबन येथील आरसीसीपीएल या बिर्ला गृपच्या सिमेंट कंपनीत भेट दिली.

झरी येथील बैठकीला तहसील, नगरपंचायत, कृषी, वनविभाग, आरोग्य व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...