Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / खातेरा पार्डि घाटावरील...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

खातेरा पार्डि घाटावरील पुलाचे बांधकाम संथ गतीने.

खातेरा पार्डि घाटावरील पुलाचे बांधकाम संथ गतीने.
ads images

झरी(तालुका प्रतिनिधि)   :- यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडनार्या पैनगंगा नदीवरील खातेरा पार्डि पुलाचे भूमिपूजन 6 ज्यूलै 2019 ला झाले. परंतु दोन वर्ष लोटूनही  पुलाचे काम अर्धवट पाहायला मिळत आहे. याचे कारण या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पुला अभावी जीव धोक्यात टाकून नदी पार प्रवास करावे लागत आहे. लाकडी डोंग्यावरचा जीवघेणा प्रवास कधी संपनार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. झरी तालुक्यातील अनेकांचे नातलग पैनगंगा नदी पलीकडे आहे. त्यामुळे ईकडून तिकडे व तिकडून इकडे येजा करण्यासाठी लांबचा प्रवास करावे लागत आहे. तर काही जन लाकडी डोंग्यावरचा जीवघेणा प्रवास  करीत नदी पार करीत आहे. पुलाचे बांधकाम चालू झाल्याचे पाहून झरी व कोरपना तालुक्यातील लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. 

परंतू  बांधकाम संथ गतीने सुरू असल्यामुळे पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार याची वाट पहावी लागत आहे. खातेरा पार्डि पुलाच्या कामाला तात्कालिन पालक मंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. पुलाचे भूमिपूजन करूण लगेच कामाला सुरुवातही केली.परंतू या पुलाच्या बांधकामासाठी महाविकास आघाडी सरकार कडून फक्त 8 कोटी रुपयांचा निधी मिळाला त्यामुळेच या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे नदीपार करण्यासाठी जीवघेणा प्रवास करत पुलाची वाट पहावी लागत आहे. 25 की.मी. लांबचा प्रवास व जीवघेणा प्रवास  यूद्धपातळीवर बांधकाम करूण मजबूत व सूंदर पुलाची निर्मिती व्हावी. अशी झरी तालुक्यातील व कोरपना तालुक्यातील जनतेची मागणी आहे. कारण या पुलामुळे 25 की.मी. लांबचा प्रवास, जीवघेणा प्रवास थांबेल, मानसिक त्रास वाचेल, आर्थिक बचत, दळणवळण, कृषी, पर्यटन, औद्योगिक विकासाला प्राधान्य मिळेल. कोरपना तालुक्यातील लोकांना कायर लिंगटी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी सोपे होईल. झरी तालुक्यातील व कोरपना तालुक्यातील सिमेंट व कोळसा कंपन्यांमधील कामगारांना रहदारी सहज शक्य होईल. या सर्व समस्यांचा विचार करून पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे अशी झरी व कोरपना तालुक्यातील लोकांची मागणी आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...