वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ : शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जातीचे दाखले, रेशन कार्ड, ओळखपत्र, विविध योजनेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दुर्गम भागातील आदिवासी पोड व पारधी बेड्यावरील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहू नये व सर्वांचा विकास व्हावा या हेतूने ‘शासन आपल्या दारी’ यासारख्या उपक्रमातून प्रशासन आपल्या जवळ पोहचून आपल्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
यवतमाळ तालुक्यातील महसुल मंडळ कापरा (मे) येथे तहसिल कार्यालय यवतमाळ यांचे वतिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत समाधान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते.
या शिबीरात पारधी समाज बांधवाना जातीचे दाखले, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पांदण रस्ता अतिक्रमण निष्कासन, सात-बारा फेरफार वाटप, कृषी साहित्य, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजने बाबत मंजुर प्रकरणातील प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी येडगे यांचे हस्ते कापरा ते सावरच्या पानंद रस्त्याचे भुमीपूजन व सनी कापरेकर यांचे शेतामध्ये रब्बी पिकाबाबत ई-पिक पाहणीचे प्रशिक्षण देण्यात आले.
या समाधान शिबीरामध्ये विविध विभागाचे कॅम्प लावण्यात आले होते. यवतमाळ वाईल्ड लाईन 1098 लक्षगट हस्तक्षेप परीयोजना, मतदान नोंदणी निवडणूक विभाग, एकात्मीक महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान, संजय गांधी निराधार योजना, कृषी विभाग, पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग डिमायन्स फाऊन्डेशन अंतर्गत शेतकरी उत्पादक संघटना, उत्पादक कंपनी व वैद्यकीय महाविद्यालय तर्फे रक्तदान व लसिकरण कॅम्प व आधार अपडेशन कॅम्प व आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी विविध योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले. तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी प्रस्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार राजेश कहारे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात सरपंच अनिता ढोले, मंडळ अधिकारी व्हि. डब्ल्यु. बकाले, तलाठी निशा उईके, ग्रामसेवक किशार जिवतोडे, संजय निबोरकर, प्रविण सोयाम, राजु महाजन, अमर शेंडे, केशव गायकी, मोहन तराडे, यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन व परिश्रम केले. तसेच जि.प.प्राथमिक शाळा कापरे येथील मुख्याध्यापक विनोद डाखोर व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. यावेळी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे, रिलायन्स ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...