Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / 20 वर्षीय कामगाराचा रेल्वे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

20 वर्षीय कामगाराचा रेल्वे पुलावरून पडून मृत्यु.

20 वर्षीय कामगाराचा रेल्वे पुलावरून पडून मृत्यु.
ads images

पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कमळवेली जवळची घटना.

 

झरी: दि.9 फेब्रुवारी रोजी पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कमळवेली गावानजीक असलेल्या रेल्वे  पुलावरील पटरीवर रेल डांग अचानक तुटल्याने  काम करणारा २० वर्षीय मजूर पुलाखाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ९ फेब्रुवारी दुपारी २ वाजताचे सुमारास घडली.   तालुक्यातील कमळवेली गावाजवळ असलेल्या रेल्वेच्या पुलावर मध्यप्रदेश येथील कंत्राटदाराचे काम सुरू होते. कंत्राटदारांच्या तुकडीत सकन परसु सऱयाम रा. कोरपनी (खुर्द) बरेली पार जी छिंदवाडा मध्यप्रदेश हा गेल्या दोन महिन्यांपासून रेस पटरी रिपेअरिंग काम त्याचा नातेवाईक मनेश राम धुर्वे सोबत करीत होता.


९ फेब्रुवारी ला दुपारी दोन वाजताचे सुमारास सकन रेल्वे पटरी रिपेअरिंग करीत असताना रेल डांग अचानक तुटली त्यात सकन पुलावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला  मार लागला . त्यात तो गंभीर जखमी झाला. ठेकेदार याने  त्याला पाटण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र  डॉक्टरांनी मृत घोषित  केले. पुलावरून खाली पडल्याची माहिती  ठाणेदार संगीता हेलोंडे याना मिळताच घटनास्थळी पोहचले व पंचनामा केला. 


पटरी वर काम करीत असताना संबंधीत ठेकेदाने सुरक्षा किट जसे हेल्मेट जोडा व इतर वस्तू देणे गरजेचे असतांना ठेकेदारांनी किट दिले नसल्याची माहिती आहे. किट असती तर तर डोक्याला गंभीर दुखापत झाली नसती असेही बोलले जात आहे.याबाबतची  तक्रार रंजितकुमार बकोरा सिंग ३५ या रेल्वे कर्मचाऱ्याने वणी पोलिसात दिली आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...