वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ : जिल्ह्यात शहरी भागातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग दिनांक 10 फेब्रुवारी 2022 पासून सुरू करण्याबाबतचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागात इयत्ता पहिलीपासून तसेच शहरी भागातील इयत्ता पाचवी पासूनचे सर्व वर्ग यापुर्वीच सुरू करण्यात आले आहेत. विद्याथी शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांची संमती आवश्यक राहील. तसेच पालकांनी संमती नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग नियमितपणे सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत.
शासनाच्या 20 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. शाळा परिसरात सर्वांना मास्क वापरने सक्तीचे राहील. शाळा दररोज 3 ते 4 तास घेण्याचे, पालकांना लसिकरणासाठी प्रोत्साहीत करण्याचे, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळेत सकाळ व दुपार च्या पाळीत वर्ग भरविणे, मैदानी खेळ, स्नेहसंमेलन इ. गर्दीचे कार्यक्रमांवर बंदी, सर्दी, ताप, खोकला असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सक्ती न करण्याचे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे तसेच गटशिक्षणाधिकारी व क्षेत्रीय पर्यवेक्षीय यंत्रणांनी शाळेत भेटी देऊन कोविड-19 नियमांचे पालन करून शाळा सुरू असल्याबाबत खात्री करण्याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...