आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
राजू गागरे (झरी तालुका प्रतिनिधी): तालुक्यातील अनेक गावांमध्ये डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तापाच्या रोगाची साथ सुरू आहे. मोठ्या व छोट्या खेडेगावातील रूग्ण दवाखान्यात वाढतच असल्याचे पहायला मिळत आहे. बरेच रूग्ण एकदोन वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखवतात दवाई घेऊन घरी जातात. व तब्बेतीत सूधारणा न झाल्यास परत खाजगी दवाखान्यात दाखवतात त्याही ठिकाणी सूधारणा न झाल्यास मोठ्या शहरी डाॅक्टरांकडे जाताना दिसत आहे. परंतु सर्व साधारण गरीबांना शहरी डाॅक्टरांकडून होणारा उपचार अती महागडा ठरत आहे. परंतु बीमार व्यक्तीच्या जीवाकडे पाहून पैसा खर्च करत असतात.
तालूक्यात वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण असल्याचे समोर येत आहे. ताप येणे, थंडी वाजून ताप येणे, अशक्तपणा जाणवने, जीव मळमळ होने, सर्दी, खोकला, चक्कर येणे, डोकं दुखणं, निमूनीया, लो बीपी, अंग दूखने, चिडचिडेपणा, ईतरही काही प्रकारच्या बीमारीचे रूग्न दवाखान्यात दाखवल्या नंतरही तब्बेतीत सूधारणा होत नसल्याची चर्चा आहे.
कोरोना सारख्या रोगांपासून नियमावलीत सुट मिळून काहीच महिना, दिवस झाले. बर्याच नागरीकांनी दोन्ही डोज घेतले. तालुक्यातील काही डाॅक्टरांनी एक दोन चक्कर मध्ये नाही पन तीसर्या चौथ्या चक्कर मध्ये रूग्णांच्या बीमारीवर नियंत्रण आणत असल्याचे दिसून येते. परंतु काही डाॅक्टर कडून चक्कर पे चक्कर होऊनही कोणत्याही प्रकारचा इलाज होत नसल्याच्य सूद्धा चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीक आपल्या रूग्णांचा लवकर उपचार व्हावा यासाठी खर्चाकडे न पाहता शहरी डाॅक्टरांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.
परंतू मजुदार , गरीबांना कोणत्याही योजनेचे कार्ड दिले तरी दवाखाना न परवडणाराच कारण घरची परिस्थिती हालाखीची असते. त्यामुळे घरच्या व्यक्तीला साथीच्या रोगांपासून वाचविण्यासाठी कमावलेल्या तुटपुंजीतून खर्च होतो. सोबतच मजुरी बुडते व परीस्थिती हालाखीची होते. अनुभवलेल्य व्यक्तीलाच या गोष्टी कळतात नाही तर विषय वाचण्यापुरताच. यामुळे झरी तालुक्यात सूद्धा कमी कीमतीत चांगला उपचार करणारा दवाखान्याची आवश्यकता वाटते.
प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये तपासणी झाल्यानंतर ईमरजन्शी बहुतेक रूग्णांना अनेक वेळा वणी, चंद्रपूर, नागपूर सारख्या ठिकाणी नेण्यास सांगतात अशा करीता वेळ वाया जाऊ नये म्हणून नागरीक आपल्या रूग्णांना थेट शहरी डाॅक्टरांकडे धाव घेत असल्याचे पहायला मिळत आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...