*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ दि. ७
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण
२०१८ मध्ये घनकचरा संकलन व विल्हेवाटीचा कामात नगरपरिषदेचा ६५ लाखाचा घोटाळा उमरखेड येथे उघडकीस आला. यावरून तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान भाजपा आमदार नामदेव ससाने यांच्यासह अकरा जणांविरुद्ध विविध कलमान्वये सोमवार, ७ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आल्याने विधानसभेत एकच खळबळ उडाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व
विल्हेवाट यामध्ये नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम ५८ (२) अन्वये कार्योत्तर परवानगी घेऊन लाखोंची बिले काढल्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली होती. सदर तक्रारीवर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी प्रकरणाची शहानिशा करून जिल्हाधिकारी यांना कामात अनियमितता झाल्याचा अहवाल सादर केला होता. यावर नगर विकास मंत्रालयाने शिक्कामोर्तब करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून आज सोमवारी उशिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
उमरखेड नगरपरिषदेच्या कचरा संकलन घोटाळ्यात नगराध्यक्ष नामदेव ससाने,तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, कंत्राटदार फिरोजखान आजाद खान, मजूर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर, महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे यांच्यासह लेखापाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव असे एकूण अकरा जणांविरुद्ध कचरा संकलन घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळल्याचे नगर विकास मंत्रालय आदेशात म्हटले होते.
यावरुन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर संबंधितांवर पोलिसात तक्रार देण्याची जबाबदारी दिली होती. यावरून मुख्याधिकारी यांनी ६ फेब्रुवारीला पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीवर ठाणेदार अमोल माळवे यांनी दस्तऐवजाची पडताळणी सुरू करून फेब्रुवारीला विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सन २०१८ मध्ये कचरा संकलन व विल्हेवाट कामामध्ये लाखो रुपयांची अनियमितता झाली असल्याची तक्रार दाखल केली होती. यावरुन आज दोषींवर गुन्हा दाखल झाला. प्रशासनाने सखोल चौकशी केल्यास आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणावरून हे सिद्ध होते की, चौकीदार हेच चोर आहेत, असे आज स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एम.आय.एम. गटनेता जलील कुरेशी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत स्वीकृत नगरसेवक रसूल पटेल आणि सय्यद अन्सार सय्यद अहमद उपस्थित होते.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...