आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी जामनी: शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी 2022 रोजी पंचायत समिती सभागृह झरी येथे तालुक्यातील संपूर्ण शिक्षकांची कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.गटशिक्षणाधिकारी मा.नगराळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक हा समाज परिवर्तनाचा मुख्य घटक असून विद्यार्थी व समाजहितासाठी शिक्षकांनी निरंतर शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवावी वाचनाने मानवाचे विचार प्रगल्भ होतात असे प्रतिपादन स्पर्धेचे परिक्षक प्राध्यापक तसेच लोकमतचे वार्ताहर श्री.पाईलवार सर ह्यांनी केले.
कथाकथन हे समाज घडविण्याचे उत्तम माध्यम असून जिजाऊंनी सांगितलेल्या श्रीकृष्ण व रामाच्या कथेच्या माध्यमातून योग्य संस्कारात शिवराय घडले.त्यामुळे मनोरंजना सह संस्कार घडविण्याचे सामर्थ्य कथेत असल्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनाची हल्ली गरज असल्याचे मत परीक्षक,प्राध्यापक श्री .संतोष पोलचेट्टीवार सर ह्यांनी व्यक्त केले.कोरोणा काळात सुध्दाझरी तालुक्यातील शिक्षणप्रक्रिया दोनही पध्दतीने अविरत चालू असल्यामुळे आज माझे विध्यार्थी उत्तम दर्जाच्या स्वयंमरचित काव्य करतात.
स्वातंत्र्याच्या अम्रुतमहोत्सवी वर्षा निमीत्ताने लवकरच आम्ही विद्यार्थ्यांच्या स्वयंमरचित कवितांचा संग्रह प्रकाशित करणार व त्या करिता कवितांचे संकलन सुद्धा सुरु आहे.कोरोणा काळात सुध्दा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कायम राखण्यासाठी शिक्षकांनी आपली भूमिका कायम ठेवली.असे मत गटशिक्षणाधिकारी मा.नगराळे साहेब यांनी व्यक्त केले.वाटेकर सर ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सदर स्पर्धेत झरी पंचायत समिती मधील ब-याच शिक्षकांनी सहभाग घेतला.
जामणी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद मडावी ह्यांनी "देतो तो देव..."ह्या कथेचे उत्कृष्ट सादरीकरण करित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. श्री लक्ष्मण काकरवार सर ह्यांनी सादर केलेल्या कथेस द्वितीय तर श्री.शंकर केमेकर सर ह्यांच्या कथेस त्रुतीय क्रमांक मिळाला.सर्व प्राविण्य प्राप्त स्पर्धकांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.बि.आर.सी.झरी च्या सर्व कर्मचाऱ्यांनी सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...