Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी नगरपंचायत अध्यक्षाकरीता...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी नगरपंचायत अध्यक्षाकरीता काँग्रेस व शिवसेनेची मोठी रस्सिखेच, कसरत

झरी नगरपंचायत अध्यक्षाकरीता काँग्रेस व शिवसेनेची मोठी  रस्सिखेच, कसरत
ads images

झरी नगरपंचायत अध्यक्षाकरीता काँग्रेस व शिवसेनेची मोठी रस्सिखेच, कसरत

झरी (प्रतिनिधि ):- नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस शिवसेना व जंगोम दलने बाजी मारली असून भाजपचा दारुण पराभव झाला. .निवडणुकीत ८७ उमेदवार उभे होते परंतु काँग्रेस ५ ,शिवसेना ५ ,जंगोमदल ४ भाजपा १,मनसे १ व १ अपक्ष असे १७ उमेदवार निवडून आले. बहुमत कोणत्याही पक्षाला नसल्याने काँग्रेस व शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. अध्यक्ष आपल्याच पार्टीचा व्हावा याकरिता काँग्रेस व शिवसेनेची मोठी धावपळ होताना दिसत आहे. नगर अध्यक्ष बनविण्याकरिता काँग्रेस व शिवसेनेचे पुढारी जंगोम दलासोबत भेटीगाठी वाढल्या तर बैठकी सुरू झाल्या आहे. .

माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात अपक्ष उमेदवाराने काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेसकडे ६ नगरसेवक झाले आहे. दोन्ही पक्षातील पुढार्यांनी नगराध्यक्ष करीत मोठी फिल्डिंग लावल्याची माहिती मुक्त आहे. विचारात घेतले असता जंगोम दल पक्षाचा सूद्धा नगराध्यक्ष होऊ शकते. त्याकरिता जंगोम दल कोणत्या पक्षासोबत हातमिळवणी करते त्यावर अध्यक्ष पदाचा निर्णय होणार आहे. काँग्रेस व शिवसेनेच्या पुढाऱ्यांना आपलाच अध्यक्ष बनतो अशी आशा आहे.परंतू त्याकरीता बहूमताची आवश्यकता आहे. व बहूमत पाठिंबा देणारा पाच वर्षांमधील नियोजन केल्याशिवाय देणार नाही.


अध्यक्ष पदाकरिता शिवसेनेतून ज्योती बीजगूनवार तर काँग्रेस पक्षतर्फे सुजाता अनमूलवार व सोनल पोयाम हे दावेदार मानले जात आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृवात तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे संचालक राजीव येल्टीवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार, माजी जी.प सदस्य प्रकाश कासावार , दिग्रसचे सरपंच तथा बाजार समितीचे माजी संचालक निलेश येल्टीवार, संचालक सुनील ढाले,माजी सभापती भूमारेड्डी बाजनलावार सह इतर पुढाऱ्यांनी तसेच शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुगुल,विधानसभा अध्यक्ष संतोष माहुरे,बाजार समिती उपसभापती संदीप विचू , सतीश आदेवार,विनोद उपररवार हसन शेख यांनी अथक परिश्रम घेऊन मतदारांना जोडून आपल्या पदरात मतदान पाडून आपले उमेदवार निवडून आणले.

परंतु नगराध्यक्ष निवडीवरून मोठी रस्सीखेच कसरत करावी लागत आहे. काँग्रेस सोबत मी शिवसेनेसोबत जंगोमदल मिळणार की महाविकास आघाडीची युती करून काँग्रेस शिवसेना मिळून अध्यक्ष होणार याकडे तालुक्यातील जनतेसह राजकीय लोकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...