आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी (प्रतिनिधी) : झरी तालुक्यातील पिंप्रडवाडी येथे २ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक समाज भवन शेड व सार्वजनिक सौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार निधी अंतर्गत च्या माध्यामातून समाज भवन शेड निर्माण केल्या जाणार असून जिल्हा परिषद निधी अंतर्गत सार्वजनिक सौचालय ही अत्यावश्यक कामाला सूद्धा सुर्वात करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांकडून माहिती प्राप्त झाली.
विषेश म्हणजे झरी तालूक्याच्या शेवटच्या टोकावर पिंप्रडवाडी हे गाव मुकूटबन ग्रामपंचायत क्षेत्रात येत असून ग्रामपंचायत सरपंच मीना जगदीश आरमुरवर, उपसरपंच अनिल राजेश्वर कूंटावार व सभासद यांच्या पाठपुराव्यामुळे छोट्याशा पिंप्रडवाडी गावासाठी निधी खेचून आणण्यात यश आले असल्याचे पहायला मिळत आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार व जिल्हा परिषद सदस्य मानकर यांच्या सहकार्याने पिंप्रडवाडी खेडेगावात विकास कामांना गती प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही दिवसांत ग्रामविकास निधी मधून १०० मिटर सिमेंट कांक्रेट रस्त्याचे काम करून झाल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर एका हायमास्ट लाईट ची सूद्धा व्यवस्था करून झाल्याचे निदर्शनास आले आहे. आरसीसी पी एल अँड एम पी बिर्ला गृप समूह तर्फे सौर ऊर्जा लाईट ची सूद्धा व्यवस्था करून झाल्याचे दिसून येत आहे. अशा विकासक कारणांमुळे पिप्रडवाडी गावाला सुंदर गाव म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. याचे कारणही तसेच आहे. स्वातंत्र्याच्या काळापासून २०१७ पर्यंत मुकूटबन ग्रामपंचायत मधून अनेक पंचवार्षिक निवडणुकीतून सभासद मिळाले. काही स्थानिक मुकूटबन येथील व गावातील सुद्धा परंतु गाव विकासाचा विचार केला गेला नाही. अजूनही गावात एकही नाली बांधकाम नाही, स्मशानभूमी नाही, सार्वजनिक सौचालय नाही, रस्त्याचा विचार केला गेला नाही, एकाही गल्लीत कांक्रेटीकरण नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सारख्या समश्या काही प्रमाणात प्रत्येक पंचवार्षिकला केल्या गेल्या असत्या तर पुढील विकासकामांमुळे सुंदर गाव म्हणून ओळख निर्माण झाली असती. जाऊद्या गेल्या दिवसांना विसरावे व गाव विकास पसरावे याच गोष्टीला महत्त्व देने योग्य ठरेल. गावातील अनेक समश्येकडे पाहूनच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सभासद यांना आमदार व जिल्हा परिषद सदस्य यांच सहकार्याने साहा लाख रुपया पर्यंत भव्य शेड व सार्वजनिक सौचालयाचे उद्घाटना पर्यंत मजल मारता आली. या उद्घाटन प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर, मुकूटबन ग्रामपंचायत सरपंच मीना जगदीश आरमुरवार, उपसरपंच अनिल राजेश्वर कूंटावार, मुकूटबन येथील बाळू बरशेट्टीवार मुकूटबन ग्रामपंचायत सदस्य राजू अक्केवार, जगदीश सर आरमुरवार, पिंप्रडवाडी येथील स्थानिक भैय्यालाल बघेले, रामचंद्र भगत, गोविंदा आवते, संभाजी पोतराजे, करमचंद बघेले, प्रशांत बघेले, रीतेश गावंडे, नंदू चिकराम, पांडुरंग गागरे, शंकर पोतराजे, सुमेध नगराळे, दशरथ भोयर सहीत असंख्य गावकर्यांनी उपस्थिती दर्शवून उदघाटनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवीली असल्याचे दिसून आले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...