Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / कत्तलीकरिता जनावरे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

कत्तलीकरिता जनावरे घेऊन जाणारे चारचाकी वाहन पोलिसांच्या ताब्यात..!

कत्तलीकरिता जनावरे घेऊन जाणारे चारचाकी वाहन पोलिसांच्या ताब्यात..!
ads images

झरी तालुक्यातील गणेश पूर गावाजवळील घटना.

राजू गारगे (झरी) :  तालुक्यातील गणेशपूर गावाकडून चारचाकी वाहनातून  तेलंगणात कत्तलीकरिता जाणाऱ्या  वाहनासह ११ जनावरे जप्त करुन  दोघांना अटक केली तर एक जण फरार झाला आहे. जनावर भरलेले वाहण पोलीस स्टेशनला लावण्यात आले.

३ फेब्रुवारी रोज मुकुटबनचे ठाणेदार अजित जाधव यांना विश्वसनीय माहीती मिळाली की गणेशपुर येथुन एक मालवाहतुक वाहन महीद्रा एम. एच ३४ एम ४३३६ मध्ये अवैधरित्या जनावरे कोंबुन जनावरे घेवून जात आहे. अशा माहितीवरून ठाणेदार जाधव यांनी पोलिस उपनिरीक्षक अनिल सकवान, सहायक फौजदार खुशाल सुरपाम,, दिलीप जाधव, संजय खांडेकर यांना माहीती देउन सदर वंशन पकडण्याचे आदेश दिले.

यावरून पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान यांनी मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समीती  जवळ नाकाबंदी केली पोलिसांना मिकलेल्या माहिती प्रमाणे गणेशपूर कडुन  एक मालवाहतुक वाहन महीद्रा एम.एच ३४- एम ४३३६ येतांना दिसले सदर वाहनास थांबविताच वाहनातील एक ईसम अंधारात पळून गेला. वाहनाचे चालकास ताब्यात घेवून पोलिसांनी नाव पत्ता विचारले असता त्याने  संदिप गणपत साखरकर वय ३२ वर्ष रा. अडेगाव असे सांगीतले तसेच त्याचे सोबत वाहनात बसुन असलेला  दुसऱ्याही इसमास ताब्यात घेऊन नाव विचारले असता राजु लिंबाजी सोयाम वय २६ वर्ष रा प्रिंपडवाडी  सांगितले.

सदर मालवाहतुक वाहनात  ११ नग जनावरांचे पायाला व मानेला नायलोन दोरीने बांधुन कोनत्याही प्रकारे चारापाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कोबुन असलेले मिळुन आले.  वाहन चालक व त्याचे सोबत असलेल्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांचे जवळील ११ नग जनावरे किंमत. १ लाख ४१ हजार   व अवैद्य व निर्दयतेने जनावरे वाहतुकीस वापरण्यात आलेली चारचाकी किंमत  १ लाख ५० हजार  असा एकुण २ लाख ९१ हजाराचा  मुद्देमाल जप्त केला. व  दोन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५ (अ) (ब) ९.९ (अ) प्राण्याचा छळ अधिनीयम १९६० कलम ११(१) () (बि) (ई) (एफ) (एच) (आय) (के) कलमा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.११ जनावरांना  मुकुटबन येथील ग्रामपंचायत कोडवाड्यात ठेवण्यात आले.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...