आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव (प्रतिनिधी) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात पंचायत समिती मध्ये येत असलेल्या वागदरा गट ग्रामपंचायत वसंत नगर तांडा अनेक वर्षापासून घरकुला पासून वंचित असून व शासनाच्या अनेक समस्या या तांड्यात असल्यामुळे शासन व प्रशासनाची डोळेझाक करीत असल्याची गावकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. कॅनरा बँक वसंत नगर तांडा असून अनेक समस्यांमुळे ग्रासलेला आहे.
आम्हाला न्याय कधी मिळणार कधी होणार आमच्या गावाचा विकास हा प्रत्येक गावकरी प्रशासन आणि शासनाला प्रश्न करीत आहे अशा आशयाचे निवेदन मारेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
व्ही जे एन टी प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशा प्रकारची मागणी या प्रवर्गातील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केलेली आहे. मारेगाव तालुक्यातील वसंतनगर हे गाव वागदरा या गट ग्रामपंचायतमध्ये येते. येथील नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घरकुलाचा लाभ मिळावा म्हणूनअनेकदा ग्रामपंचायतची पायरी झिजवली. ग्रामपंचायत कार्यालयानेही या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पंचायत समितीमध्ये पाठपुरावा केला. परंतु या व्ही जे एन टी प्रवर्गातील नागरिकांना योजनेअंतर्गत अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा घरकुलचा लाभ मिळाला नाही.
व्ही जे एन टी या प्रवर्गातील नागरिक हे घरकुल या योजनेपासून अद्यापपर्यंत वंचीत आहेत. त्यामुळे पात्र असूनही या प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ न मिळाल्याने घरकुलापासून वंचीत असलेल्या नागरिकांनी पंचायत समिती गाठत गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. यात व्ही जे एन टी प्रवर्गाला घरकुलाचा लाभ न मिळाल्यास उपोषणास बसू अशा प्रकारचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष नबी शेख, कांता राठोड, पुष्पा जाधव, बेबी राठोड, ममता जाधव,सुनीता राठोड,सीमा राठोड, तोता राठोड,रेखा जाध , संगीता राठोड, सुनीता पवार, कमल जाधव,मंगला पारखी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...