वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वनविभाग यवतमाळ तर्फे प्रकाशित "यवतमाळचे पक्षी वैभव" या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्री संदीप पानभुमरे यांच्या हस्ते काल बचत भवन येथे करण्यात आले. या पुस्तकामुळे पक्षीप्रेमी अभ्यासक व पर्यावरण प्रेमींना यवतमाळचे पक्षी वैभव आकर्षित करुण यवतमाळची नव्याने ओळख होईल व पर्यटनास चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक अनंता डिगोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम व पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ.प्रवीण जोशी उपस्थित होते.
सदर पुस्तकात यवतमाळ तालुक्यासह लगतच्या अन्य सहा तालुक्यातील जलाशये माळराने झुडपी जंगले या अधिवासात आढळणाऱ्या स्थलांतरीत व स्थानीक असे 323 पक्ष्यांचे उत्तम छायाचित्र व त्यांचे संक्षिप्त वर्णन दिलेले आहे, सोबतच पक्षी आढळणाऱ्या जागांचा नकाशा दिलेला आहे. महत्वाचे म्हणजे सुरवातीला पक्षांची शास्त्रीय सुची दिलेली आहे. या उपक्रमासठी पालक मंत्र्यांनी वनविभागाचे अधिकारी व लेखक प्रा.डॉ. प्रवीण जोशी यांचे अभिनंदन केले व भविष्यात असे प्रकारच्या अन्य उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...