Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / उद्याला झरीत जंगोम...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

उद्याला झरीत जंगोम दल व वंचितची एकत्र बैठक..!

उद्याला  झरीत जंगोम दल व वंचितची एकत्र बैठक..!
ads images

राष्ट्रीय जंगोम दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित असणार.

वणी(प्रतिनिधी :-  राष्ट्रीय जंगोम दल व वंचित बहुजन आघाडीची उध्या झरी येथील विठ्ठलराव उईके यांचे निवासस्थानी सकाळी ११ वा एकत्र बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या वैठकीला जंगोल दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मारोतीदादा उईके तर वंचितचे पदाधिकारी उपस्थित असणार आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या झरीजामनी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत जंगोम दल व वंचित बहुजन आघाडीने संयुक्त निवडणुक लढवून ९ पैकी ४ जागेवर घवघवीत यश संपादन केल्याने राजकीय वर्तुळात प्रस्थापितांना चांगलीच चपराक दिली आहे. झरी जामनी हा तालुका आदिवासी बहुल असून जंगोम दल हे आदिवासी युवकांच संघटन प्रचंड मजबूत आहे. आणि त्याला जोड आता वंचित बहुजन आघाडीची मिळाल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांचे  धाबे चांगलेच दणाणले आहे. 

नगर पंचायतीत ४ जागेवर विजय मिळवून जिल्ह्यातील राजकारणाला विचार करायला भाग पाडले आहे. राजकीय घडामोडीवर विचार विनिमय व विजय उमेदवाराचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रीय जंगोम दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मारोतीदादा उईके, प्रदेशाध्यक्ष सुवर्णा वरखडे, वंचित  बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, निवडणूक निरीक्षक मिलिंद पाटील, मंगल तेलंग, विठ्ठल उईके, कालिदास उईके, चेतन कुडमिथे, राजू शेख, नवनिर्वाचित नगर सेवक ज्ञानेश्वर  कोडापे, सौ. सीमा मंडाले, अनिल आत्राम सौ संगीता  किनाके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित असणार आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...