Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / शेतातील तुरीच्या गंजीला...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

शेतातील तुरीच्या गंजीला भीषण आग, 80 क्विंटली तूर जळून खाक..!

शेतातील तुरीच्या गंजीला भीषण आग, 80 क्विंटली तूर जळून खाक..!

(राळेगाव तालुका प्रतिनिधी): महागाव तालुक्यातील तुळशीनगर येथील शेतकरी संजय जानुसिंग राठोड यांनी ३५ एकरातील तुर कापून काढण्यासाठी गंजी मारली होती. मात्र मळणीयंत्र मधून तुर काढण्या आधीच रात्री कोणी तरी तुरीच्या गंजीला आग लावल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांचे यावर्षी आधीच अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशातच तूर या पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव मधील तुळशीनगर येथे शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला कोणी तरी अज्ञातांनी आग लावल्याने त्यात तब्बल ८० क्विंटल तूर जाऊन खाक झाली. ही घटना बुधवारीच्या रात्री दरम्यान घडली.

या नुकसानीमूळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र ही तुर संपूर्ण जळून खाक झाली. शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दोन दिवसांनीच होती मळणी - अधिकचे क्षेत्र असल्याने गेल्या 8 दिवसांपासून कापणीचे काम सुरु होते. शिवाय आता पावसाने उघडीप दिल्याने दोन दिवसांमध्ये यंत्राचे सहायाने ते मळणी करणार होते. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदल आणि अवकाळी यामुळे शेतीकामे रखडली होती. आता कुठे वातावरण निवळले होते. एवढे दिवस निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत त्यांनी पिकांची जोपासणा केली पण अज्ञातांनी केलेल्या या घटनेतून राठोड तुरीचे पीक वाचवू शकले नाहीत. तक्रार दाखल, मदतीची अपेक्षा - ही घटना निदर्शनास आल्यानंतर संजय जानुसिंग राठोड यांनी महागाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. या घटनेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. त्यामुळे राठोड यांचे दुहेरी नुकसान झाले असून पोलीसांनी या घटनेतील आरोपींना जेरबंद करण्याची मागणी केली आहे तर नुकसानभरपाई देण्याची मागणी राठोड यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...