वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: केंद्रशासनाचे महिला व बाल विकास विभागाद्वारे समाजात महिला सशक्तीकरण, समाज व राष्ट्र निर्माण करण्याचे कामात उत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती तसेच संस्था यांना दरवर्षी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात योणार आहे. सदर पुस्काराकरिता www.awards.gov.in या संकेतस्थळावर 31 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज/आवेदन मागविण्यात येत आहे.
पुरस्काराचे स्वरुप रुपये दोन लक्ष व प्रशस्तीपत्र असे असून यासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. नारी शक्ती पुरस्काराकरिता वैयक्तीक अर्ज करणाऱ्यांचे वय दि. 01 जुलै 2021 रोजी 25 वर्षे पुर्ण केलेले असावे, नारी शक्ती पुरस्कार करिता संस्था आवेदन करीत असले तर त्यास सामाजिक कार्याचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असावा. अर्जदारास यापुर्वी मंत्रालयाने दिलेल्या स्त्री शक्ती पुरस्कारासह पुर्वीचा समान पुरस्कार प्राप्त असू नये. उत्कृष्ट कार्यासाठी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला जाऊ शकतो, शक्यतो व्यक्ती/गट/संस्था/स्वयंसेवी संस्था इत्यादी यांना महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या किंवा या बाबीशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबीमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये उत्कृष्ट कामगीरी केलेली असावी. निर्णय क्षमता, कौशल्य विकास, ग्रामिण भागातील महिलांना सोयी सवलती उपलब्ध करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, कल व संस्कृती, खेळ, महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, जिवन कौशल्य इ. बाबतीत महिला सक्षमीकरण करण्यासाठी केलेले योगदान याबाबतचा अनुभव असावा.
राज्य अथवा केंद्रशासीत प्रदेशात बाल लैगिंक गुणोत्तर अचुकपणे सुधारण करण्याचे काम करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येईल. साधारणपणे पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार नाहीत मात्र अपवादात्मक प्रकरणात प्रस्ताव सादर केल्यानंतर मृत्यू झाला असल्यास मार्गदर्शक तत्वांमध्ये नमुद केल्याप्रमाणे पुरस्कार दिले जातील, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योति कडू यांनी कळविले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...