वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
(राळेगाव तालुका प्रतिनिधी ) : राळेगाव तालुक्यातील खडकी सुकळी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तथा श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे तत्कालिन अध्यक्ष स्व.शशिशेखर कोल्हे यांचे सातव्या पुन्यस्मरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८/१/२०२२ रोजी विद्यालयाच्या परिसरात आँनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव कोल्हे व प्रमुख पाहुणे यवतमाळ येथील प्रतिष्ठित नागरिक प्रदीपजी जयस्वाल व संचालक मंडळींनी सर्वप्रथम स्व. शशिशेखर कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळीचे पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाकडून स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभ आटोपल्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य विलासराव निमरड सर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व शाळेत सुरु असलेल्या विकास कामाची माहीती दिली व सोबतच श्रद्धांजली अर्पण करूंन प्रास्ताविक आटोपते घेतले.त्यानंतर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्रावनसिंगजी वडते सर यांनी स्व.शशिशेखरजीच्या जिवनावर प्रकाश टाकत त्यांनी उपभोगलेली पदे, कार्य करण्याची पद्धती याबद्धल सविस्तर माहीती दिली. व श्रद्धांजली अर्पण करून आटोपते घेतले.
यानंतर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेशराव टेंभेकर सर यांनी सुद्धा श्रद्धांजलीपर भाषणातून शशिशेखरजी कोल्हे यांच्या शालेय विकास कार्यावर प्रकाश टाकला.त्यानंतर विद्यालयातील शिक्षक राजेशजी भोयर सर यांनी सुद्धा आपल्या श्रद्धांजलीपर भाषणातून त्यांच्या कार्याची आठवण करून दिली.त्यानंतर कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव कोल्हे यांनी अध्यक्षिय भाषणातून श्रद्धांजली अर्पण करतांना म्हणाले की, शाळेचा सर्वांगिन विकास हेच भाऊंचे स्वप्न होते असे सुतोवाच करून अध्यक्षिय भाषण आटोपते घेतले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सहाय्यक शिक्षिका कु वैशालीताई सातारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगांबरराव बातुलवार सर यांनी केले.हा कार्यक्रम आँनलाईन पध्दतीने घेण्यात आला.या कार्यक्रमाला जवळपास शंभर विद्यार्थी आँनलाईन ज्वाईन झाले होते.या कार्यक्रमाला मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष आशिषजी कोल्हे,संस्थेचे सचिव रोशनजी कोल्हे,संचालक शेखरराव झाडे,गुलाबराव महाजंन,सुरेशराव गंधेवार उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक रंजय चौधरी,मोहन आत्राम, मोहन बोरकर,विशाल मस्के, सौ कुंदा काळे,सौ स्वाती नैताम,सौ वंदनाताई वाढोणकर, उज्वलाताई तिजारे,अमित बातुलवार तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वाल्मिक कोल्हे,पवन गिरी, शुभम मेश्राम,,बाबुलाल येसंबरे,विनोद शेलवटे यांंनी अथक परिश्रम घेतले.हा कार्यक्रम कोरोनाचे नियमाचे पालन करून घेण्यात आला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...