Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / बीएस ईस्पात कोळसा खाणची...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

बीएस ईस्पात कोळसा खाणची माहिती देण्यास टाळाटाळ ।। माहितीच्या अधिकाराची अधिकाऱ्यांकडून पायमल्ली.

बीएस ईस्पात कोळसा खाणची माहिती देण्यास टाळाटाळ ।। माहितीच्या अधिकाराची अधिकाऱ्यांकडून पायमल्ली.
ads images

गटविकास अधिकारी यांनी दाखवली केराची टोपली.

रफीक कनोजे (मुकूटबन) झरी जामणी : तालुक्यात ग्रामपंचायत भेंडाळा या क्षेत्रात बीएस ईस्पात कोळसा खाण (मार्की मांगली-३) मध्ये कोळसा उत्खनन सुरू आहे. या खाणी बद्दल भेंडाळा येथील समाजसेवक लिनेश सातपुते यांनी ६ डिसेंबर ला माहितीचा अधिकार अधिपत्यात माहिती मागितली असता चाळीस दिवसाच्या वर कार्यकाळ झाला तरी ही माहिती देण्यास तहसीलदार व गटविकास अधिकारी झरी जामणी हे टाळाटाळ करीत आहे.

भेंडाळा येथील समाजसेवक लिनेश सातपुते यांनी तहसीलदार झरी जामणी यांना ६ डिसेंबर सोमवार ला माहितीचा अधिकार अधिपत्यात बीएस ईस्पात कोळसा खाण (मार्की मांगली-३) ला देण्यात आलेली ना हरकत प्रमाणपत्राची सत्यप्रत, या खाणी मध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगचे वेळापत्रक व त्यात किती अंतर असावे, वाहतूक नियमांतर्गत निर्यात करीत असलेल्या वाहनांमध्ये किती टन कोळसा वाहतूक सुरू आहे आणि त्याच्या वजन परवान्याची सत्यप्रत, कोळसा खाणी बाबत इतर परिपूर्ण सत्यप्रती माहितीच्या अधिकार अंतर्गत १५ दिवसाच्या आत व्यक्तिशः माहिती देण्यात यावी अशी मागणी केली होती परंतु चाळीस दिवस होऊन सुध्दा तहसीलदार झरी जामणी यांनी भेंडाळा येथील अर्जदार दिनेश नामदेव सातपुते यांना माहिती तर दिलीच नाही तसेच कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही.

तसेच ग्रामपंचायत कार्यालय भेंडाळा यांनी बीएस ईस्पात कोळसा खाण (मार्की मांगली -३) ला देण्यात आलेली ना हरकत प्रमाणपत्राची सत्यप्रत तसेच ग्रामपंचायत भेंडाळा येथील रहिवासी असलेले किती कर्मचारी कोळसा खाणीत कार्यरत आहे त्यांची नावासहित माहिती देण्यात यावी याकरिता गटविकास अधिकारी झरी जामणी यांना माहितीचा अधिकार अंतर्गत भेंडाळा येथील दिनेश नामदेव सातपुते यांनी माहिती मागितली ती माहिती चाळीस दिवस होऊन सुध्दा गट विकास अधिकारी यांनी दिलीच नाही तसेच कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला गेला नाही त्यामुळे माहितीच्या अधिकाराला गटविकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखवुन पायमल्ली केल्याचा आरोप सातपुते यांनी दैनिक सिंहझेप प्रतिनिधी कडे केला आहे.

भेंडाळा येथील लिनेश सातपुते यांनी तहसील कार्यालयात ६ डिसेंबर ला दिलेला माहितीचा अधिकार अर्ज मिळाला आहे. तहसील कार्यालयाकडून ९ डिसेंबरला बीएस ईस्पात कोळसा खाण (मार्की मांगली-३) ला माहिती देण्यासंबंधी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे, तसेच लिनेश सातपुते यांना सुध्दा ९ डिसेंबरला पत्र दिलेले आहे. या कार्यालयाकडून सदर प्रकरणात कार्यवाही झालेली आहे :- तहसीलदार गिरीश जोशी झरी जामणी.


लिनेश सातपुते यांनी पंचायत समिती कार्यालयात ६ डिसेंबर ला माहितीचा अधिकार अर्ज दिला असून माहिती देण्याचा कालावधी निघून गेलेला आहे. प्रपत्र ब मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे अपील न करता लिनेश सातपुते यांना प्रपत्र ब माझ्याकडे भरायला (द्यायला) सांगा :- गजानन मुंडकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती झरी जामणी.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...