वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
रफीक कनोजे (मुकूटबन) झरी जामणी : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच वातावरण बदलामुळे मागील दोन दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. विलगीकरण आणि इतर नियमांचे पालन करावे लागू नये म्हणून हे रुग्ण कोरोना चाचणी करण्याचे टाळत आहेत. घरातच उपचार किंवा जवळील खासगी डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दवाखान्यात या रुग्णांची गर्दी वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून झरी जामणी तालुक्यात सुध्दा अनेक रुग्ण मिळाले आहे. त्यात, वातावरणात झालेल्या बदलामुळे सगळीकडे सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. सध्याच्या करोना संसर्गाची लक्षणेही सारखीच आहेत. त्यामुळे अनेक नगरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील खाजगी दवाखान्यांत साथीचे आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अडेगाव च्या खाजगी दवाखान्यांत दिवसाला १०० ते १५० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर प्रत्येक गावात सर्दी, खोकला आणि तापाचे ५० ते १०० रुग्ण खाजगी दवाखान्यांत उपचार करीत आहे. कोरोनाची लक्षणेही सारखीच असल्यामुळे अनेक जण कोरोना चाचणी करण्यास पुढाकार घेत नाहीत. चाचणी केल्यानंतर बाधित आढळल्यास विलगीकरणात राहावे लागेल, त्यामुळे अनेक जण चाचणी करण्यास टाळाटाळ करत असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. एखाद्या रुग्णास सतत तीन दिवस ताप, सर्दी किंवा अंगदुखी असेल तर त्याला करोना चाचणी करण्याचे डॉक्टरांकडून आवाहन केले जात आहे.
वातावरण बदलामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात, करोना संसर्गाची लक्षणेही अशीच असल्यामुळे एखाद्या रुग्णामध्ये ही लक्षणे सतत तीन दिवस आढळून आल्यास व कमी होत नसल्यास त्यांना करोना चाचणी करण्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार, पुढील उपचार करण्यात येत आहेत :- डॉ. मोहन गेडाम तालुका आरोग्य अधिकारी झरी जामणी.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...