Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / भूमिपुत्रांनी कंपनीचा...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

भूमिपुत्रांनी कंपनीचा रास्ता बंद करताच कंपनीला आली जाग || १९ व्या दिवशी उपोषणाची सांगता.

भूमिपुत्रांनी कंपनीचा रास्ता बंद करताच कंपनीला आली जाग || १९ व्या दिवशी उपोषणाची सांगता.
ads images

रफीक कनोजे (झरी-जामणी) मुकूटबन : मुकूटबन येथील आरसीसीपीएल कंपनी अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या फाटकाच्या बाजूला ३० डिसेंबर पासून धरणे आंदोलन व सोमवार (ता. १०) पासुन आमरण उपोषणला सुरुवात करून बोचऱ्या थंडीत व पावसात आमरण उपोषण सुरू केले होते. या दरम्यान कंपनीने आंदोलन कर्त्यांसोबत तीन वेळा बैठक घेऊन सुध्दा दखल न घेतल्याने १९ व्या दिवशी सोमवार १७ जानेवारी ला आंदोलन कर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आरसीसीपीएल कंपनी अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीच्या मुख्य फाटका समोर ३:३० वाजता कंपनीच्या विरोधात मुर्दाबादचे नारे देत दोन तास कंपनीचा मुख्य रास्ता रोको केला तेव्हा कंपनी प्रशासन हादरले असे म्हणतात ना "नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही" या म्हणी प्रमाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाला मदतीसाठी बोलावून ठाणेदार अजित जाधव यांनी ५:३० वाजता पोलीस ठाण्यात लगेच बैठक आयोजित केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन कंपनी प्रशासनाने कंपनीत भूमिपुत्रांना पगार पटावर नौकरीवर घेणार असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लिखीत आश्वासन देऊन १९ व्या दिवशी आंदोलन व उपोषणाची सांगता करण्यात आली.

१३४ शेतकऱ्यांनी ४३४ एकर शेती दहा, अकरा वर्षापूर्वी भविष्यात नौकरी मिळेल या आशेवर कंपनीला कवडीमोल भावात विकल्या परंतु कंपनी शेतकरी पुत्रांना ठेंगा दाखवून मागील चार वर्षापासून ठेकेदारी पध्दतीने काम देत आहे. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना आरसीसीपीएल कंपनी अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीच्या पगार पटावर शैक्षणीक पात्रतेनुसार नौकरी व कंपनीच्या नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी व ईतर सवलती देणार नाही तोपर्यंत आंदोलन व आमरण उपोषण सुरू राहील वेळ पडल्यास सिमेंट कंपनीला सळो कीं पळो करून सोडू असा असा इशारा देत आंदोलन व उपोषण सुरू होते. आरसीसीपीएल कंपनी अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनी, कंपनीत भूमिपुत्रांना पगार पटावर नौकरीवर घेणार नाही यावर तिन्ही बैठकीत ठाम होती.

आमरण उपोषणाच्या १९ व्या दिवशी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना सिमेंट कंपनीच्या पगार पटावर शैक्षणीक पात्रतेनुसार नौकरी देऊ असे सांगून कंपनी कडून सोमवारला सकाळी ११ वाजता चौथी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यातही वेळेचे बंधन न पाळता बैठक न घेता दुपारी २:३० वाजता कंपनीतर्फे पत्र पाठवुन मंडपातील पोलीस कर्मचाऱ्याला दिले त्या पत्रात प्रकल्पग्रस्तांना ठेकेदाराच्या माध्यमातूनच नौकरी वर घेऊ. प्रकल्पग्रस्तांना कंपनीत नोकरीवर घेणार नाही असे त्या पत्रात नमूद होते. कंपनी कडून न्याय देण्याची भूमिका नसल्याने सोमवारचा दिवसही चर्चेविना जातानाचे लक्षण दिसताच ऐनवेळेवर प्रकल्पग्रस्त सोमवार (ता. १७) ला दुपारी ३:३० वाजता मुकूटबन येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांनी, शेतकरी व महिलांनी फाटक बंद करून दोन तास कंपनीची वाहतूक सेवा बंद करून कंपनीतील एकही कर्मचारी व कामगारांना सुध्दा आत किंवा बाहेर जाऊ दिले नाही. फाटक बंद करून आंदोलन केले यावेळी ठाणेदार अजित जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

या आंदोलनात कंपनीच्या विरोधात वासुदेव विधाते, मनोज आकीनवार, दत्तात्रय चिंतावार, गणपत बच्चेवार, अखील बरशेट्टीवार यांनी जय जवान जय किसान, आरसीसीपीएल कंपनी मुर्दाबाद, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची असे गगनभेदी नारे देत कंपनी प्रशासनाला हादरून सोडले. तेव्हा कंपनी प्रशासन हादरले त्यांनतर कंपनीने पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाकडे मदतीची याचना केली. ठाणेदार अजित जाधव यांनी लगेच तहसीलदार गिरीश जोशी यांना माहिती देऊन लगेच बोलावून घेतले. संध्याकाळी ५:३० वाजता पोलीस ठाण्यात लगेच बैठक आयोजित केली. या बैठकीत कंपनीचे अधिकारी दत्ता, पंत, दिनेश अडकिनी व ईतर अधिकारी, तहसीलदार गिरीश जोशी, ठाणेदार अजित जाधव, मंडळ अधिकारी बाबुसींग राठोड, सरपंच मिना आरमुरवार, वासुदेव विधाते, शेतकरी संघर्ष समितीचे प्रदीप टोंगे, दिनेश बर्लावार यांचे समक्ष सकारात्मक चर्चा होऊन या बैठकीत टप्या टप्याने स्थानिक १३४ प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना शैक्षणीक पात्रतेनुसार कंपनीतील पगार पटावर नौकरीवर घेणार, कंपनीच्या नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी व ईतर सवलती देणार असे आश्वासन दिले ते शेतकरी संघर्ष समितीने मान्य केले त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लिखीत मध्ये दिले.ही बैठक संध्याकाळी ७ वाजता संपली. संध्याकाळी ७:३० वाजता बैठकीतील सर्वजण उपोषण स्थळावर जाऊन चार उपोषण कर्ते संभा गोविंदा पारशिवे, सचिन अरुण चिंतावार, योगेश गणपत बच्चेवार, शुभम ऋषी जिन्नावार यांना तहसीलदार गिरीश जोशी व मंडळ अधिकारी बाबुसिंग राठोड, सरपंच मिना आरमुरवार व कंपनीचे अधिकारी दत्ता यांचे हस्ते मँगो फंटाचे ज्यूस पाजून १९ व्या दिवशी उपोषणाची सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...