वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): पांढरकवडा - जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून ट्रायबल फोरमचे अमरावती विभागीय अध्यक्ष रितेश परचाके यांनी केली आहे.
कोवीड १९ प्रादुर्भावामुळे सन २०२० या वर्षात राज्यभरातील शाळांतील सर्वच वर्ग बंद होते.त्यानंतर शासनाने केलेल्या उपाययोजनामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही कालावधीनंतर सुधारल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेली होती. १० नोव्हेंबर ,२०२० च्या शासन परिपत्रकान्वये इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग अटी व शर्ती निश्चित करुन २३ नोव्हेंबर, २०२० पासून तर १८ जानेवारी, २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता दिली होती.
त्यानंतर राज्यात कोरानाची दुसरी लाट वाढत गेली.त्यामुळे शासनाने १५ एप्रिल , २०२१ पासून राज्यात पुन्हा लाँकडाऊन जाहीर केले. शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये टप्प्याटप्प्याने वर्ग सुरु करुन प्रथम आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहे.त्यानंतर पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. तद्नंतर गेल्या डिसेंबर मध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले.शाळा कश्याबश्या रुळावर आलेल्या होत्या. विद्यार्थी शाळेत जाऊन शिक्षण घेत होते. परंतू १० जानेवारी पासून १५ फेब्रुवारी पर्यंत पुन्हा शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून प्रदीर्घ काळ शाळेपासून दूर राहत असल्यामुळे त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर दूरगामी परिणाम होत आहे.इयत्ता पहीली ते आठवी पर्यंतची मुले घरीच असल्यामुळे त्यांच्यावर शारिरीक, मानसिक तणाव येऊन दुष्परिणाम होत आहे.पुढे जसा जसा कालावधी जाईल,तसे तसे नुकसान भरुन काढणे कठीण जाईल. आधी कोरोना नंतर डेल्टा आता ओमाँयक्रान हे विषाणूचे बदलते व्हेरिएंट भविष्यात ही सुरुच राहणार आहे.शेवटी मानवाला कोरोना सोबत जगावे लागणार आहे. त्यामुळे भितीपोटी सरसकट शाळा बंद करणे हा उपाय ठरु शकणार नाही.
शाळा ५०% विद्यार्थी क्षमतेने, शिफ्ट पद्धत असा अवलंब करुन चालू ठेवण्यात याव्यात. जेणेकरून शाळेत विद्यार्थी गेला पाहिजे व शिकला पाहिजे.त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग पुनश्च सुरु करण्याचे आदेश निर्गमित होऊन विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्यात यावे अशी मागणी ट्रायबल फोरमचे अमरावती विभागीय अध्यक्ष रितेश परचाके यांनी केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...