Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सुपूर्द नाम्यावर अवैध...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सुपूर्द नाम्यावर अवैध गौणखनिज वाहणाची सुटका..!

सुपूर्द नाम्यावर अवैध गौणखनिज वाहणाची सुटका..!
ads images

तहसीलदार साहेब हे चाललंय तरी काय? जोखिम स्वीकारून वाहन ताब्यात देणाऱ्याचा सवाल.

भारतीय वार्ता (अडेगाव प्रतिनिधी ): झरी तालुक्यात मोठे प्रमाणात अवैध गौणखनिज चोरीचा सपाठा सुरु असून, सिमेंट कंपनीच्या गरजेसाठी वाटेल ते करून गौणखनिज सर्रास जिथून मिळेल तिथून उचलणे सुरु असून, त्याचे लोन आता खेडेगावात पोचले आहे, या गौखनिज चोरट्याना कुठलीच भिती उरली नाही. त्यातूनच सर्वच अवैध धंद्याला अभय देण्याचं काम  संबंधित कर्मचारी करत असल्याने अडेगाव येथे विना परवाना हायवा गावकरी युवकांनी पकडून दिला असून, तो मात्र सुपूर्द नाम्यावर सोडला असून, युवकांनी तहसीलदार साहेब हे चाललंय तरी काय असा सवाल अवैध गौणखनिज वाहन पकडून देणाऱ्या युवकांनी सवाल केला असून, युवकांनी जिल्हाअधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. 

या विषयी सविस्तर वृत असे की, दि. ११ जानेवारी रोजीच्या संध्याकाळी १० वाजताच्या दरम्यान हायवा क्र.  MH 34 BG 5128 चे चालक आकाश पुंडलिक  कुतरमारे (३५) मु. कृष्णानपूर हे वाहनात विना परवाना गौणखनिज (मुरूम ) घेऊन गावातील धनंजय पाचभाई याच्या प्लाट जवळ टाकीत असताना अरुण हिवरकर, दिनेश ठाकरे, शंकर झाडे, संजय झाडे, अभय पानघाटे, गौवर्धन गेडाम, गौरव धोटे यांनी शासन गौणखनिज चोरीला लगाम देण्यासाठी जागृती दाखवून जगती माईन्स मध्ये चालणारे हायवा वाहन पकडून महसूलचे पायाभूत सेवक कु, एम व्ही. बरशेट्टीवार यांना घटना स्थळी बोलावून महसूल परवाना व नियम यावर विचारणा केली असता, अनेक विसंगती लक्षात आल्या असता, त्यावर तलाठी  बरशेट्टीवार फौंजदारी कार्यवाही न करता, ते वाहन पोलीस पाटील अशोक उरकुडे व शांताराम सुरेश वऱ्हाटे गाव कोतवाल यांच्याकडे सुपूर्द नाम्यावर देत अनोखी कमाल केली. त्यानंतर तहसीलदार यांचेशी संपर्क केला. मात्र कोणताही प्रतिसाद न देता. त्या नतंर त्या वाहणातील गौणखणीज मुरूम खाली टाकून घटना स्थळावरून रवाना केला, या वरून गावकरी युवकांनी साहेब हे चाललंय तरी काय? तहसीलदार यांना सवाल केला असून या प्रकरणातील संबंधित अधिकारी यांच्या विरोधात जिल्हाअधिकारी यांच्याकडे  तक्रार करण्याची भूमिका युवकांनी घेतली असून हाच सवाल करून समोर हाच जबाब जिल्हा अधिकारी यांना विचारला जाणार आहे. या मुळे गावात वैरत्व आम्ही स्वीकारचे आणि महसूल सेवकांने ते सोडून द्यायचे, म्हणजे आधळा दळतो कुत्र पिट खातो, असेच धोरण म्हणजे असल्या अवैद्य धंद्याला संबंधित कर्मचारी खत पाणी घालतो की काय हे ह्या घटनेवरून समोर येत आहे. 

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...