Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / दुचाकीवरुन आलेल्या...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

दुचाकीवरुन आलेल्या मारेकऱ्यांकडून गोळ्या घालून डॉक्टरची हत्या, यवतमाळ हादरलं..!

दुचाकीवरुन आलेल्या मारेकऱ्यांकडून गोळ्या घालून डॉक्टरची हत्या, यवतमाळ हादरलं..!
ads images

उमरखेड येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञाची गोळ्या झाडून निर्घृन हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रुग्णालयासमोरील गोरखनाथ हॉटेलच्या समोर दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.


यवतमाळ : उमरखेड येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञाची गोळ्या झाडून निर्घृन हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रुग्णालयासमोरील गोरखनाथ हॉटेलच्या समोर दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. हनुमंत धर्मकारे (४२) असे मृत बालरोग तज्ज्ञाचे नाव आहे. डॉ. हनुमंत धर्मकारे मागील सात वर्षांपासून उत्तरवार शासकीय रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. याशिवाय त्यांचे उमरखेड बसस्थानकाच्या समोर खासगी बाल रुग्णालय आहे.

नेहमीप्रमाणे ते मंगळवारी देखील रुग्णालयात ड्युटीवर आले होते. दुपारच्या सुमारास ते चहा घेण्यासाठी गोरखनाथ हॉटेलमध्ये गेले. चहा घेतल्यानंतर हॉटेलमधून रुग्णालयात जाण्यासाठी बाहेर येत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या छाती व पोटावर बेछूट गोळीबार केला. त्यामुळे डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या दुचाकीस्वाराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मारेकरी शाईन वाहनाने भरधाव वेगाने पसार झाला.
यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरला नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश मांडण यांनी डॉ. धर्मकारे यांना मृत घोषित केले. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नागरिकांनी येथील शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली.
विशेष म्हणजे आज माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे उमरखेडच्या दौऱ्यावर होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आदी उपस्थित होते.
दरम्यानच्या काळात वातावरण शांत ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...