Home / महाराष्ट्र / यशवंत मनोहर सर तुमचे...

महाराष्ट्र

यशवंत मनोहर सर तुमचे चुकलेच - चंद्रकांत झटाले, अकोला.

यशवंत मनोहर सर तुमचे चुकलेच  - चंद्रकांत झटाले, अकोला.

भारतीय वार्ता - विदर्भ साहित्य संघातर्फे मराठी साहित्यविश्वात आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या विदर्भातील साहित्यिकाला कै. ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या नावाने 'जीवनव्रती' हा पुरस्कार दिला जातो. १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा मानाचा समजल्या जाणारा 'जीवनव्रती' पुरस्कार प्रसिद्ध कवी व विचारवंत यशवंत मनोहर यांनी ऐन वेळी नम्रपणे नाकारला. पुरस्कार वितरण समारंभात सरस्वतीची प्रतिमा न ठेवता सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे किंवा महान साहित्यिकांची  प्रतिमा ठेवावी, अशी विनंती त्यांनी विदर्भ साहित्य संघाला केली होती, पण विदर्भ साहित्य संघाने या विनंतीला प्रतिसाद न दिल्याने त्यांनी हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांच्या भूमिकेवर केलेले चिंतन.

           "मी धर्म मानत नाही, म्हणूनच लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझा रागही करतात; पण म्हणून मी कधीही माझी भूमिका बदलली नाही. माझा सरस्वतीशी काय संबंध? अशा प्रतिमा या शोषणसत्ताकाची प्रतीके आहेत. प्रतीकांची प्रतिष्ठा मी का वाढवू, असा कार्यक्रम जर साहित्यविषयक असेल तर त्यात कुसुमाग्रज, मुक्तिबोध, इंदिरा संतांची प्रतिमा ठेवायला हवी." ही यशवन्त मनोहर यांची भूमिका अगदीच मान्य आहे. परंतु त्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला न जाता पुरस्कार नाकारण्याच्या भूमिकेबद्दल जरा वेगळ्या बाजुनेसुद्धा विचार व्हायला हवा असं वाटतं. हा वाद वरकरणी फक्त प्रतिकांबद्दल वाटत असला तरी तो समानता-विषमता, तत्त्वनिष्ठा- लांगुलचालन, सावित्री आणि  सरस्वती विषयी आहे हेसुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे.
              सरस्वती ला विद्येची देवता मानलं जातं. देवी-देवतांबद्दल आपल्यावर लहानपणापासून संस्कार झालेत की या जगात सर्व  देवाची लेकरे आहेत. देवी-देवता सर्वांना आपली मुलं मानतात, ते मुला-मुलांमध्ये भेदभाव करत नाहीत. सर्वांना समान न्याय देतात, कुणावरच अन्याय होऊ देत नाहीत. ज्याप्रमाणे एखादी नदी भेदभाव न करता सर्वांना सारखं पाणी देते,  एखादी आई आपल्या दोन्ही मुलांना सारखं प्रेम देते, सारखं जेवायला देते, सारखी काळजी घेते त्याचप्रमाणे देवी-देवता या जगाची सारखी काळजी घेतात. पण हजारो वर्षांपासून बहुजनांना शिक्षणापासून-ज्ञानापासून वंचित ठेवणार्‍या, भेदभाव करणार्‍या सरस्वतीला आम्ही विद्येची देवता कसं मानावं?       
              सरस्वतीने एका लेकराला ज्ञानाध्ययनाचा अधिकार दिला तर एकाला नाही. ज्या लेकराला शिक्षणाचा अधिकार दिला, त्याचा फायदा करून दिला, त्याच्या उदरनिर्वाहाची सोय करून दिली त्याने खुशाल सरस्वतीला विद्येची देवता मानावं,  त्याबद्दल कुणालाही काही हरकत असण्याचं कारण नाही. परंतु ज्याला कायम ज्ञानापासून वंचित ठेवलं, गुलामीत ठेवलं, शिक्षणच सोडा पण माणूस म्हणून जगण्याचेही सर्व अधिकार नाकारले त्याने का म्हणून सरस्वतीला देवता मानावं? तशी बळजबरी करणे योग्य नाही. अर्जुनाला विद्याभ्यास करण्याचा अधिकार दिला म्हणून अर्जुनाने सरस्वतीला विद्येची देवता मानावं पण एकलव्यावर तुम्ही कशी काय ही गोष्ट थोपवू शकता? हिंदू असून छ. शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाचा अधिकार नाकारला, छ. शाहू महाराजांना वेद ऐकण्याचा, वाचण्याचा अधिकार नाकारला म्हणजे ज्यांना वेद वाचणे, ऐकणे, पाहण्याचा अधिकार नाही, जिला विद्येची देवता म्हणतात त्या सरस्वती ची पूजा करण्याचा सुद्धा अधिकार नाही त्या हिंदूंनी पण का मानावं की सरस्वती आमची देवता आहे?  
                     हिंदूंची देवी असून 50% स्त्रिया व 30% शूद्र अशा जवळपास 80% हिंदूंना विद्येचा अधिकार नाकारणार्‍या सरस्वतीला विद्येची देवता मानावं की संपूर्ण भारताला 100%  विद्येचा अधिकार मिळवून देणार्‍या सावित्रीला देवता मानावं? आज देशातील 80% जनता सावित्रीबाई मुळे शिकली व शिकत आहे. सरस्वतीने बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवलं परंतु सावित्रीने तर ब्राह्मणांनाही वंचित ठेवलं नाही. त्यांच्याही स्त्रियांना शिक्षण दिलं. जात-धर्म-लिंग-पंथ कुठलाच भेदभाव केला नाही. आपल्या सर्व लेकरांना सारखी वागणूक दिली. मग सावित्रीला का आराध्य मानू नये?  सावित्रीने अशी कोणतीच गोष्ट नाही जी सर्वांसाठी केली नाही. त्यांनी शाळा काढली ती सर्वांसाठी. त्यात सर्वच जाती-धर्माच्या मुलींना शिक्षण दिलं. त्यांनी 1863 मध्ये सर्वच जाती-धर्मातील विशेषतः ब्राम्हण समाजातील स्त्रियांकरिता ’बालहत्या प्रतिबंधक गृह’ स्थापन केले. विधवांच्या केशवपना विरोधात बंड केलं. शिक्षणासह असे अनेक अधिकार जे कुठल्याही धर्माने किंवा धर्मग्रंथाने स्त्रियांना दिले नाहीत ते सावित्रीने मिळवून दिले मग देवता कोण? सावित्री की सरस्वती? 
               सरस्वती एक स्त्री असून तिला स्त्रीचे दैन्य, दुःख, तिची गुलामी, तिच्या भावना कळू नयेत? इतर धर्मातील स्त्रियांच्या सोडा हिंदू स्त्रियांच्या भावनाही कळू नयेत? त्या सावित्रीला कळाव्यात. त्यातून स्त्रियांना मुक्त करण्यासाठी सावित्रीने खस्ता खाव्यात? आज जो तुम्ही हा लेख वाचू शकत आहात तोसुद्धा सावित्रीमुळेच मग विद्येची देवता कोण? सरस्वती की सावित्री?
कुणी म्हणेल की सरस्वतीने सर्वांनाच समान अधिकार दिला होता परंतु पुरोहितांनी तो बहुजनांपर्यंत पोहोचू दिला नाही. मग असं बोलणार्‍यांना माझा सवाल आहे की, काही पुरोहितांपुढे जिची ताकद चालत नाही त्या सरस्वतीला देवता मानायचच कशाला? आणि जर सरस्वतीनेच बहुजनांना विद्येचा अधिकार नाकारला असेल तर मग तिला देवता का मानावं? देवता असणार्‍या सरस्वती जे करू शकल्या नाहीत त्या मनुष्य असलेल्या सावित्रीबाई ने केलं मग आम्ही पुजावं कुणाला? महात्मा फुले-सावित्रीबाई, छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंग्रज जर या देशात नसते तर आमचं जीवन केवळ पशुवत झालं असतं.
            मला कायम प्रश्न पडतात की, भारतात विद्येची देवता सरस्वती असूनसुध्दा भारत विद्येत मागे का? जगातल्या सर्वात चांगल्या 200 विद्यापीठांत भारतातील एकही विद्यापीठ का नसावे? पाश्चात्य अ‍ॅलोपॅथी पेक्षा भारतीय आयुर्वेद इतके मागे का? सरस्वतीच्या भारतात सुईचेही संशोधन नाही आणि सरस्वतीला जेे ओळखतही नाहीत त्या पाश्चात्यांनी राजकीय, सामाजिक, औद्योगीक, विविध आधुनिक विद्याशाखांमध्ये इतकी संशोधने केली आहेत की, डोळ्यांसारख्या नाजूक अवयवाची शस्त्रक्रीया केल्यावरही रुग्णाला पत्ता लागत नाही. कुठल्याही विषयाच्या उच्च शिक्षणासाठी सरस्वतीच्या देशाला इतर देशांमध्ये का जावं लागतं? म्हणजे जिथे सरस्वतीच अस्तित्व नाही तीथेही विद्येचं अस्तित्व आहे असं सिध्द होत नाही काय?
              विदर्भ साहित्य संघाने तिथे प्रतिमा ठेवली ते त्यांच्या दृष्टीने बरोबरच आहे.  कारण त्यांना सरस्वतीपासून लाभ झालेला आहे. कारण त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाल्याने दुःख व गुलामी भोगावी लागली नाही. त्यांनी ठरवलं सरस्वतीची  पूजा करावी, तिला देवी मानावं त्यांच्यासाठी ते बरोबरच आहे कारण त्यांच्यासाठी तिने सोय करून दिली आहे.  त्यांच्यासाठी बहुजनांना डावलून विशेष अधिकार प्राप्त करून दिले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करून दिली आहे. पण ज्यांचे अधिकार हिरावले त्यांनीसुद्धा तीला देवीच म्हणावं असा त्यांचा आग्रह आम्ही का स्वीकारावा?
                   यशवंत मनोहर सरांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. त्यांच्याबद्दल नितांत आदरातूनच ह्या भावना व्यक्त करतोय. यशवंत मनोहर सरांचं जर मी जाहीर व्याख्यान ठेवलं तर त्याठिकाणी त्यांचे चाहते, त्यांच्या विचारांचे समर्थकच येऊन त्यांचे विचार ऐकतील. म्हणजे ज्यांना आधीच त्यांचे विचार पटलेले आहेत तेच लोक येऊन पुन्हा ते विचार ऐकतील, पण विदर्भ साहित्य संघाच्या मंचावर जाऊन यशवंत मनोहर सरांना आपल्या विचारांपेक्षा वेगळ्या विचारांच्या लोकांमध्ये जाऊन आपले विचार-आपली बाजू मांडण्याची दुर्मिळ संधी होती ती त्यांनी गमवायची नसती. त्याठिकाणी जाऊन त्यांनी सरस्वती आणि सावित्रीमधील फरक सांगितला असता तर निश्चितच त्यांची भूमिका अधिक व्यापकपणे समाजात पोचली असती. सर आपण घेतलेल्या निर्णयात कुणीच ढवळाढवळ करू शकत नाही. ते तुमचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. आपल्यापेक्षा भिन्न विचारांचे लोक जगात आहेत हे त्यांचं विचारस्वातंत्र्य स्वीकारून, त्या मंचावर जाऊन, आपल्या तत्वानुसार सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन न करता आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या श्रोत्यांच्या डोक्यात आपल्या विचारांचं बीज टाकण्याची आयती संधी चालून आली होती. तिथे जाऊन तुम्ही टाकलेल्या शेकडो बीजांपैकी निदान 5 बीजांचे तरी कालांतराने वटवृक्ष तयार झालेच असते. अशी संधी जर कुणालाही भेटली तर त्यांनी  ती कधीच सोडू नये. यशवंत मनोहर सर तुमचे चुकलेच. 

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...