खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : येथील तहसील कार्यालय परिसरात असलेल्या सेतू सुविधा केंद्राकडून विद्यार्थी व नागरिकांची लूट होत असल्याची तक्रार युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आली. वणी तहसिल कार्यालय परिसरात असलेल्या सेतू सुविधा केंद्राचे कंत्राट संपलेले असुन सुद्धा हे सेतू सुविधा केंद्र विनापरवानगी सुरु आहे. या सेतु केंद्रात जे शुल्क आकारले जाते त्यापेक्षा अधिकचे शुल्क घेत आहे. तसेच तात्काळ प्रमाणपत्र असल्यास १५०० ते २००० हजार रुपयांची मागणी करतात असा आरोप दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे.
उपविभागीय कार्यालयातील संबधीत लिपीक व संबंधित निवासी नायब तहसीलदार सुद्धा प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. शिवाय सेतू केंद्रातील कर्मचारी यांचेमार्फत सुद्धा पैसे घेऊन प्रमाणपत्र तात्काळ देतात. ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना २० ते २५ दिवस प्रमाणपत्रासाठी वाट बघावी लागतेय. या तक्रारींची दखल घेत शहर शिवसेनेच्या वतीने तक्रार करण्यात आली होती. त्याबाबत विविध व्रुतपत्रात बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या होत्या मात्र याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आता युवासेनेच्या वतीने बुधवार दि.१३ऑक्टोंबर ला वणी दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी तक्रार करण्यात आली आहे.
या तक्रारीत सेतू सुविधा केंद्रातून विद्यार्थी व नागरिकांची अतोनात लूट चालू असल्यामुळे कंत्राट संपलेले सेतू सुविधा केंद्र तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख, अजिंक्य शेंडे, मिलिंद बावणे, हेमंत गौरकार, अमृत फुलझले, बबन खेडकर, सुमित चौधरी, ध्रुव येरणे, सौरभ वानखेडे, नितीन तुराणकर व सुयश नगराळे यांनी केली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...