Home / महाराष्ट्र / साहित्यिकांची लेखनी...

महाराष्ट्र

साहित्यिकांची लेखनी ठरताहेत जनजागृतीचे माध्यम..

साहित्यिकांची लेखनी ठरताहेत जनजागृतीचे माध्यम..

कोरोना लसिकरणासाठी कवितेतून संदेश : फिनिक्सने काढली दोन पुस्तके

गोंडपीपरी (चंद्रपूर) : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या सोबतच आता आरोग्य ही मुलभूत गरज बनली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात समज-गैरसमज व भितीदायी वातावरण असतांना जिल्ह्यातील साहित्यिकांनी कोरोनाविरुद्ध युद्ध पुकारुन लेखनीतून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. वेदनांना कवींच्या आशेच्या शब्दांचा आधार दिलासा देणारा ठरत आहे.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात  फिनिक्स साहित्य मंच, चंद्रपुर व पंचायत समिती गोंडपिपरी द्वारा जिल्ह्यातील लेखक, कवींना कोरोना जनजागृतीसाठी लिहीते केले. साहित्यिकांचे शब्दांना जनजागृतीचे माध्यम बनवले. 'संदेश कोरोना लसिकरणाचा' या शिर्षकाखाली तीन ऑनलाईन कविसंमेलने पार पाडली. समाजमाध्यमातून कवितांना व्यापक प्रसिद्धी देवून जिल्ह्यातील कवी, लेखकांना कोरोना योद्ध्याची भुमीका देवून जनजागृती करवून घेतली.

 या उपक्रमातील कविता व संपादित पुस्तके समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक आहे :- धनंजय साळवे ( संयोजक तथा सहा.गट विकास अधिकारी, गोंडपिपरी) 

सहा.गटविकास अधिकारी धनंजय साळवे, फिनिक्स साहित्य मंचाचे अध्यक्ष नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेकर यांनी 'आरोग्यावर बोलू काही' या कोरोनाविरुद्ध एकुण ५२ जनजागृतीच्या कवितांचे संपादन पुस्तकरुपात केले. कोरोना लसिकरणाबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी नुकतेच 'पुन्हा श्वास घेण्यासाठी' या १९ कविंच्या कवितांचे पुस्तकरुपाने फिनिक्सतर्फे कवी धनंजय साळवे, नरेशकुमार बोरीकर, अविनाश पोईनकर, गोपाल शिरपूरकर यांनी संपादन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले व श्याम वाखर्डे,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साहित्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपणा-या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच कपीलनाथ कलोडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.), शेषराव बुलकुंडे गट विकास अधिकारी,गोंडपिपरी तथा डाँ.हेमचंद कन्नाके उरो तज्ञ तथा निवासी वैद्यकीय अधिकारी सा.रुग्नालय,चंद्रपूर यांनी लोकजागृती करीता पुस्तकाला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

 जिल्ह्यातील कवी सुरेंद्र इंगळे, संतोषकुमार उईके, जयवंत वानखेडे, मिलेश साकुरकर, सुनिल बावणे, अरुण घोरपडे, पंडीत लोंढे, राजेंद्र घोटकर, नरेंद्र कन्नाके, राजेंद्र पोईनकर, सुधाकर कन्नाके, संभाशीव गावंडे, बी.सी.नगराळे, शितल धर्मपुरीवार, रोशनकुमार पिलेवान, प्रदीप देशमुख, किशोर चलाख, अरुण झगडकर, दुशांत निमकर, मीना बंडावार, प्रविण आडेकर, दीपक शीव, अमीत महाजनवार, नितीन जुलमे, सुनिल कोवे, सुनिल पोटे, वैशाली दिक्षीत, चंद्रशेखर कानकाटे, ईश्र्वर टापरे यांनी कोरोना जनजागृती व लसीकरणासाठी लेखन करुन योगदान दिले आहे.  सध्याच्या काळात जिल्ह्यातील कवी, लेखकांची लेखणी कोरोना निर्मूलन व लसीकरणासाठी जनजागृतीचे प्रभावी माध्यम असून यातून जनतेतील गैरसमज दूर होवून आशावाद निर्माण होईल.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...