शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
वणी: धाब्यावर काम करनारे दोन कामगारांमध्ये जुंपली व वाद विकोपाला जाऊन एकाने दुसऱ्याला लोखंडी सळाखीने मारून जख्मी केल्याची घटना काल २१ एप्रिल ला बुधवारी सकाळी ११ वाजता घडली असुन गुन्हा सायंकाळी ६.३० वाजता सुमारास झाला. हि घटना झोला ढाब्यावर घडली आहे . पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वणी वरोरा रोडवरील झोला शिवारात (पाटाळा पुलाजवळ) असलेल्या ढाबा येथे वेटर असलेल्या दोन युवकांमध्ये ग्राहकाचा टेबल लावण्यावरून चांगलीच जुंपली. वाद एवढा विकोपाला गेला की, एकाने दुसऱ्याला लोखंडी सळाखीने मारून जख्मी केले. धाब्यावर काम करणाऱ्या युवकांना ग्राहकांना चांगली सेवा पुरविल्यास बक्षीस मिळत असल्याने तेथील कामगार काही निवडक ग्राहकांना सेवा पुरविण्यास पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतात. याच पुढाकार घेण्याच्या वादातून एकाने दुसऱ्याला जख्मी केले.
धाब्यावर काम करणाऱ्या किशोर नामक वेटरने अमोल भीमराव कळसकर (२८) रा. घुगुस, ह.मु. ढाबा झोला शिवार याला ग्राहकाला टेबल लावण्याच्या कारणावरून लोखंडी साळखीने मारून जख्मी केले. याबाबत अमोल कळसकर याने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी किशोर सालघन (३६) रा वणी नामक वेटर विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...