Home / महाराष्ट्र / स्वतःच स्वतःशीच तिसरे...

महाराष्ट्र

स्वतःच स्वतःशीच तिसरे महायुद्ध सुरू..

स्वतःच स्वतःशीच तिसरे महायुद्ध सुरू..

मारोती डोगे (कोरपना):   हे युद्ध जगावर राज्य करण्यासाठी नाही. हे युद्ध महासत्ता बनण्यासाठी नाही. हे युद्ध दुसऱ्या देशावर सत्ता गाजविण्यासाठी नाही. हे युद्ध पाण्यासाठी नाही. हे युद्ध नैसर्गिक साधन संपत्ती हडपण्यासाठी नाही. तर हे युद्ध स्वतःच स्वतःशी करत असलेले तिसरे महायुद्ध आहे जणू.
       कारण या युद्धाला सुरुवात मागील वर्षी म्हणजेच 2019 शेवटपासून झाली. त्यात आपल्याला काही आघाड्यावर जिंकता आले. हे युद्ध एका देशापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगावर आपलं आधिपत्य स्थापन केले. म्हणून त्याला महायुद्ध म्हणावे लागेल.
       या युद्धात मानवजातीवर बंदुकीचा वार होत नाही. या युद्धात मिसाईल चा वापर होत नाही. भूदल, नौदल, वायुदलचाही वापर होत नाही. नागासाकी व हिरोशिमा सारखे शहरे नष्ट होत नाही. विषारी वायूने जनता मृत्युमुखी पडत नाही. या युद्धात शत्रू एकच आहे, पण वातावरणाने तो आपले रूप बदलविण्यात सक्षम आहे. म्हणूनच मानवाला प्रतिकार ही करता येत नाही. हे खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे या युद्धाचे.
       2019 पासून या युद्धाला आपण अगोदर काही भागापुरते मर्यादित समजत होतो आणि आपण आपली काळजी घेणे वाऱ्यावर सोडून दिले. त्याच वाऱ्याने आपल्याला आपली जागा दाखविली असेच आपल्याला म्हणावे लागेल.
       आपल्या भारत देशात या युद्धाचा शिरकाव फेब्रुवारी महिन्यात झाला. त्या वेळची परिस्थिती आपल्या हातात होती, पण आज 2021 मध्ये एप्रिल महिन्यातील परिस्थिती आपल्या हातात नाही. आता तुम्हाला समजलं नसेल मी कोणत्या महायुद्धाबद्दल बोलत आहे ते.
        होय. कोरोना विषाणूच घेऊन आलाय. हे तिसरे महायुद्ध. या पृथ्वीवर असणारा एकही देश या विषाणूपासून सुटलेला नाही. मोठमोठ्या महासत्ता देशांनी कोरोनापुढे गुडघे टेकले आहे. तो मग अमेरिका असो, रशिया असो, ब्राझील असो, फ्रान्स असो किंवा आपला विकसनशील देश भारत असो. गरीब देशावर तर दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची पाळी आली. या कोरोनाविषाणू घातलेल्या तिसऱ्या महायुद्धामुळे.
       तिसऱ्या महायुद्धामध्ये शत्रू हा कोणता देश नसून एक असा विषाणू आहेत. त्याला आपण पाहू शकत नाही, पण तो आपल्याला पाहू शकतो आणि सरळ आपल्या शरीरात जाऊन वार करतो. हे आहे या युद्धाचे मुख्य वैशिष्ट्य. प्रत्यक्ष युद्धात समोर न येता गनिमी काव्याने वार करून आपल्या शरीराची नासधूस करतो हा विषाणू.
      आपण मानव बाहेरून चांगले दिसतो. आपल्याला असे काही जाणवतही नाही. तरीपण आपण कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत जात आहे. कारण आपण जणू हारच मानली असे आज आपल्याला पृथ्वीवर दिसत आहे.
      कारण अशा कित्येक लढाय्या, युद्धे झाली. त्यात शत्रू हा मानव होता. सत्ता प्राप्त करणे आणि राज्य करणे हा मुळ हेतु होता. पण या तिसऱ्या महायुद्धात मानव जात नष्ट करणे. आणि कोरोना हा राजाच्या मुकुटा सारखा  दिसतो. विषाणूचे राज्य निर्माण करणे हाच उद्देश दिसत आहे. त्या राजाच्या निर्जीव मुकूटा जीव फुटला असे समजायचे का? कारण तो मुकूट राज्याचा अभिमान होता, आणि आत्ताचा कोरोना मुकूट राजाला नष्ट करून ती सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा जणू प्रयत्न करत आहे, असेच म्हणावे लागेल.
       मुकूटा सारखा दिसला तरी, राजा कधी होणार नाय.
       प्रजेच्या रक्षणासाठी, मार्ग तुला दाखवावाच लागेल.

       कोरोनाविषाणू सोबत लढण्यासाठी मार्ग आहेत, पण ही मानव जात इतकी विकोपाला गेली आहे की, आपला अहंकार सोडायला तयार नाही. कारण संपूर्ण जग गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव संपूर्ण जगाला झाली. त्याच अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग म्हणून आपण मुक्त संचार करतो. आज त्यातच आपण बळी पडत आहोत. कारण या पृथ्वीवर आपण आपल्याला वाटेल ते करू शकतो. पण आपल्या शरीराची काळजी घेण्यात कमी पडत आहोत म्हणून. कोरोना विषाणू पुन्हा शक्तिशाली बनून आपल्यावर वार करत आहे. पण आपल्याकडे प्रतिकार करण्यासाठी काही उरले नाही. कारण प्रतिकार करण्यासाठी मास्क, सेनिटायझर,  दोन व्यक्ती मधील सोशल डिस्टन्स, आरोग्य विभागाचे नियम, प्रशासनाचे वेळोवेळी दिलेले आदेश आपण पाळलेच नाही.
      
मागील वर्षी कोरोनाची खूप भीती मानव जातीत झाली होती. तेव्हा एक जण मृत्युमुखी पडला तरी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत होते. तो आपला नातेवाईक नसला तरीही, पण काहीतरी जान आपल्या हृदयाला होत होती. म्हणून मृतांची संख्या वाचली तरी आपल्याला वेदना होत होत्या.
      आज आपल्याच भारत देशामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या महायुद्धाने जगामध्ये दुसरा नंबर गाठला आहे. तरीही त्याची जाणीव आपल्याला झाली नाही. मागील वर्षी पेक्षा मृतांचा आकडा जास्त आहे, रुग्णही झपाट्याने वाढत आहे. तरीही आपल्या हृदयाला काहीच कशी जाणीव होत नाही.
      त्याचे कारण असे की मानवाला आपले जीवन नकोसे झाले आहे, असे तरी आज मला वाटते. कारण सततच्या दोन वर्षापासून जीवन जगण्यासाठी करत असलेला संघर्ष आणि जगण्याची उमेद नाहीशी होताना दिसत आहे. म्हणून आजची परिस्थिती प्रशासनाच्या हाता बाहेर जाताना दिसते.

     हे मानवा येऊ दे, कितीही संकटे तुझ्या अंगावर.
     तुझा स्वाभिमान जागृत कर, नको ठेवू तू गहाण.
     लढण्याची जिद्द असेल अंगात, तर तू होईल महान.
     हा कोरोना तुला, संपवायला आलाय. 
     तूच त्या कोरोनाला, संपवायला उभा राह.
     तु या जन्मामध्ये संघर्ष, करता करता मोठा झाला.
     संघर्षामधून वाट तुला, शोधावीच लागेल.
     तुझ्या जन्माचे सार्थक, तुला दाखवावेच लागेल.
     तुला जिंकण्यासाठी, पृथ्वीवर जन्माला आलाय.
     त्या जन्माला तू विसरू नको, विसरू नको.

     हे मानवा तू कशाला घाबरत आहे. या कोरोनाला काय? त्या मातृत्वाला जाग जरा. त्या मातेने तुला जन्म देऊन या सुंदर जगाचे दर्शन घडविले. त्या एका विषाणूचा बळी जाण्यासाठी मुळीच नाही. तुझ्या अंगी असलेल्या संघर्षातून जिंकण्याची हिंमत जागी कर. तुझ्या कल्याणासाठी तुला उठून उभे व्हावेच लागेल. कोरोना हा विषाणू असला तरी तो आघात अशा वेळी करतो, जेव्हा आपण आपली सेफ्टी आपण पाळत नसतो तेव्हा. आपले शस्त्र मास्क, सेनिटायझर,  दोन व्यक्ती मधील सोशल डिस्टन्स, आरोग्य विभागाचे नियम, प्रशासनाचे आदेश आहे. जीवन खूप सुंदर आहे, त्याला व्यर्थ नको जाऊ देऊ आणि या कोरोना विषाणूच्या तिसऱ्या महायुद्धाला लढण्यासाठी तत्पर उभा राहायला शिक. आपल्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजेच तिसऱ्या महायुद्धातून विजय प्राप्त करणे होय.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...