*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*
*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
विशेष रस्ते योजनेअंतर्गत १२ कोटी रुपयांच्या रस्ते बांधकामासाठी शासनाला पाठविला प्रस्ताव
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या करणवाडी - खैरी या मार्गाची अतिशय दुर्दशा झाली आहे. कुंभा- बोरी गदाजी- खैरी या मार्गावरील रोड अतिशय खराब झाला असून रोडमध्ये मोठ मोठे गड्डे पडले आहे. डांबर पूर्णपणे निघून गेले आहेत. संपूर्ण रस्ता हा चिखलाने व खड्डयाने माखला आहे अशी बातमी भारतीय वार्ता या पोर्टल मार्फत भारतीय वार्ता वणी विभागीय प्रतिनिधी व बोरी(गदाजी) येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष साबरे यांनी लावून धरली होती.याच बातमीचा इम्पॅक्ट म्हणून वणी विधानसभेचे आमदार मा संजीवरेड्डी बोदकूरवार यांना अखेर या बाबीची दखल घ्यावी लागली. आशिष साबरे यांनी भारतीय वार्ता पोर्टल मार्फत तसेच वेगवेगळ्या सोशल माध्यमांच्या माध्यमातून या मार्गाची सत्यपरिस्थिती आमदारांसमोर मांडली होती यादरम्यान मा आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी मारेगाव तालुक्यातील हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे.रस्त्यात मोठं मोठे गड्डे ,चिखल यामुळे वाहन चालविताना चालकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खराब रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे ही बाब मान्य करून या मार्गाचे काम लवकर सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी भारतीय वार्ता प्रतिनिधींशी बोलताना दिली.
करणवाडी- खैरी हा रस्ता राज्यमहामार्ग नसल्याने या मार्गासाठी निधी लवकर उपलब्ध होत नाही असे त्यांनी सांगितले. तसेच या मार्गावर माईन असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जड वाहनाची रेलचेल असते असेही ते म्हणाले. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी त्यांनी विशेष रस्ते अंतर्गत शासनाला १२ कोटी रुपये मंजूर आणि उपलब्ध करून देण्यासाठी मा बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना प्रस्ताव पाठविलेला आहे.लवकरात लवकर चांगल्या दर्जाचा रोड करणवाडी- खैरी या मार्गावर बनेल असे आश्वासन त्यांनी दिले.सामाजिक कार्यकर्ते आशिष साबरे यांनी या मार्गाविषयी माहिती देताना सांगितले होते की रात्रीच्या वेळी तर वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. रस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहे.
रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी हा मार्ग तर मृत्यूद्वारच बनला आहे. पाठीचे आजार वाढत आहे. अतिशय खराब दर्जा या रोडचा झालेला असून खासदार आमदारासह स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष करीत आहे. या मार्गाचे लवकरात नूतनीकरण होणे गरजेचे आहे न झाल्यास भविष्यात मोठ्या आंदोलनाची मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. या सर्व बाबीची अखेर मा आमदारांनी दखल घेतल्याने या परिसरातील जनतेला आनंद झाला आहे परंतु जोपर्यंत प्रत्यक्षात या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यत या बाबीचा पाठपुरावा होतच राहील. आमदारांनी स्वतः या रस्त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या रोडची पाहणी करावी असे मत सामाजिक कार्यकर्ते आशिष साबरे यांनी व्यक्त केले आहे.
*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...
*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...
वणी : प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शना खाली वणी येथील संतोषकुमार जयस्वाल, संचालक...
*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...
वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...