संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): आज दिनांक 18 नोव्हेंबर ला मा.जिल्हाधिकारी ,व मा अधिक्षक अभियंता म.रा.विद्दुत वितरण कंपनी यांना शेतकरी संघटनेच्या नेत्या, सौ प्रज्ञाताई बापट प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी, यांचे नेतृत्वात यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटना व स्वभापचे शिष्टमंडळाने भेट घेऊन शेतीपंपाचे विजबिल दुरूस्ती करून शेतक-यांना द्यावे, तो पर्यंत विजपुरवठा बंद करण्याची कारवाही करू नये. विज मंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांनी जोर जबरदस्ती ने कारवाही केल्यास शेतक-यांसह शेतकरी संघटना व स्वभापचे कार्यकरते या कारवाईचा प्रतीकार करेल, असा ईशारा चर्चेतून आणी निवेदनातून दिला आहे.
शेतीपंपाचे विज बिल हे मिटर रिडींगने न देता, सरासरीने देण्यात आले, ज्यांचे हार्सपावर ने बिल आकारण्यात आले, त्यांना 3 एचपी भार असणा-यांना 5 एचपी चे, 5 एचपी चा भार असणा-यांना 7.5 एचपीचे बिल देण्यात आले. हा एचपी चा आकार आकारतानी 24 तास विज पुरवठा गृहीत धरून बिलात आकारणी केल्या गेली आहे. जेव्हा की, शेतकरी 4 महिने पावसाळ्यात व उन्हाळ्यात विहिरींना पाणी राहत नसल्याने व शेतात पीक नसल्याने 3 महीने शेतीपंपाचा वापर करीत नाही. विज नियामक मंडळाचे कायद्या नुसार जेवढा वापर केला, तेवढेच बिल द्यावे अशी तरतूद असतांना सुध्दा या कालावधीचा वापर दाखवून शेतीपंपाचे विजबिल देण्यात आले.
जे पूर्णतः चुकीचे व नियमबाहय आहे, ते तातडीने दुरूस्ती करून द्यावे. नंतरच शेतक-यां कडून वसूलीची कारवाही करावी. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारांनी कृषीपंपाचे विज वापरावर दिलेले अनुदान किती दिले? ते वजा करता शेतक-यांना किती रक्कम भरायची आहे, याची स्पष्ट नोंद बिलात द्यावी. याप्रमाणे दुरूस्ती करून विज बिल शेतक-यांना द्यावे, त्यानंतरच शेतक-यां कडून बिलाचे रकमेची मागणी करा़वी. बेकायदेशीर रित्या आकारणी केलेल्या बिलासाठी, विज कंपनीने जोर जबरदस्ती ने वसुली किंवा विजपुरवठा बंद करण्याची कारवाही करू नये. अशी मागणी चर्चेतून व निवेदनाव्दारे केली आहे.
याच मागण्यांचे निवेदन मा जिल्हा पोलिस अधीक्षक, यांना देऊन विज कंपनीला विज बंद करण्या करिता पोलिस स्वरक्षण देवून शेतकऱ्यांचे पर्यायाने देशाचे नूकसान करण्यात येऊ नये असे निवेदनात म्हटले आहे. या शिष्टमंडळात राज्य कार्यकारिणी सदस्य विजय निवल, जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग, इदरचंद बैद, कृष्णराव भोंगाडे, दीपक आंनदवार, देवेंद्र राऊत, चंद्रशेखर देशमुख, सोनाली मरगडे, बबनराव चौधरी, जयंतराव बापट, अक्षय महाजन, गोपाल भोयर, गजानन ठाकरे,इत्यादींचा शिष्टमंडळात सहभाग होता. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...