वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
घुगुस (प्रतिनिधी): माननीय आमदार महोदयांनी मागणी केल्यानुसार राज्यामध्ये आरोग्य संस्थाचा पुर्ववत आराखडा तयार करण्यात येतो. त्याअनुषंगाने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व स्थानिक माजी आ. नानाभाऊ श्यामकुळे यांनी घुग्घुस येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाकडे वारंवार मागणी केली होती.
त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने सन 2014 रोजी जो 2001 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापन पूर्वक आराखडा तयार करण्यात आला होता. त्या आराखड्यामध्ये घुग्घुस येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. 24 ऑक्टोबर 2018 रोजी शासनाकडून घुग्घुस येथे ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मंजुरी नंतर सन 2019 च्या महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पात राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयास निधी मंजूर केला. त्यानंतर जागेचा शोध घेण्यात आला व शेवटी त्याच ठिकाणी इमारत बनविण्याचा निर्णय करण्यात आला. घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाच्या निर्माण कार्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असताना सन 2019 मध्ये जेव्हा निविदा काढायची वेळ आली, तेव्हा महाराष्ट्रातील जनमताचा अनादर करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे कारण पुढे करून सर्व निविदा बंद केल्या आणि दोन वर्षांनी ही बंदी उठविली.
घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाची अर्थसंकल्पीय प्रशासकीय मंजुरी ही भाजपा सरकारच्या काळातील आहे. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी हे रुग्णालय आम्ही मंजूर केले असे म्हणणे ही हास्यास्पद असून आयत्या बिळावर नागोबा ही काँग्रेसी नेत्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळे भाजपाने केलेल्या विकासकामांचे श्रेय काँग्रेसच्या नेत्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेसचे स्थानिक नेते म्हणायचे, बसस्थानक बांधणाऱ्यांना ग्रामीण रुग्णालय दिसले नाही का? तर वस्तुस्थितीत घुग्घुस येथील बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, पाणी पुरवठा योजना, सिमेंट रस्ते, नाल्या, हायमास्ट लाईट, शुद्ध पाण्याचे आरो मशीन, दहा बगीचे, स्मशान भूमी, धार्मिक स्थळे अशी अनेकानेक विकासकामे भाजपानेच केली आहे.
घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे सुरु असलेले काम मागील 23 दिवसापासून बंद होते, याविरोधात भाजपाने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेताच शासन प्रशासनाला जाग आली आणि आता कामास सुरुवात करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांनी गावात आधी विकासकामे खेचून आणावी व त्याचे खुशाल श्रेय घ्यावे. परंतु भाजपा सरकारच्या काळातील विकासकामांवर श्रेय लाटण्याचे लाजिरवाणे प्रकार बंद करावे असे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...