Home / चंद्रपूर - जिल्हा / त्या निकृष्ट दर्जाचा...

चंद्रपूर - जिल्हा

त्या निकृष्ट दर्जाचा पाणी टाकी बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी ?

त्या निकृष्ट दर्जाचा पाणी टाकी बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी ?

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश, चौकशी समिती गठीत !

जिवती: चंद्रपूर जिल्ह्यात शेवटच्या टोकावर तेलंगणा राज्य सीमेवर आदिवासी अतिदुर्गम क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे व औद्योगिक शहर गडचांदूर नगरपरिषदच्या सहाय्य निधीतून शहरातील मध्यभागी असलेल्या पाणीच्या नवीन टाकीचे बांधकाम करण्यात आले.

मात्र सदर टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तरी त्याची योग्य ती चौकशी करून दोषींवर उचित कार्यवाही करावी अशी तक्रार काही दिवसांपूर्वी येथील विरोधी नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे  यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी साहेब, नगरविकास मंत्री,जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विभाग चंद्रपूर यांच्यकडे ३ जून २०२१ रोजी निवेदनाद्वारे केली होती.याविषयी जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार न.प.कडून १० जून रोजी सदर कामाची सध्यास्थितीचा अहवाल न.प.ने १० जून रोजी सादर केला होता.आता जिल्हाधिकारी यांनी प्रकरणानुषंगाने नियमानुसार योग्य चौकशी होण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करून   त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश १० जुलै रोजी पत्राद्वारे दिला आहे.

सदर कामाची कार्यान्वय यंत्रणा ही महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाला देणे गरजेचे होते.मात्र या कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या हेतुने  सदरचे काम न.प.कडेच ठेवल्याचे आरोप करण्यात आले.तसेच याची देखरेख न.प.आरोग्य विभाग प्रमुख,मेकॅनिकल इंजिनीअर स्वप्निल पिदूरकर याच्याकडे देण्यात आली असे तक्रारीत नमूद आहे.आता ज्याला सिव्हिल कामांचा कुठलाही अनुभव नाही अशा मेकॅनिकल इंजिनीअरकडे जर सिव्हिलची कामे दिली तर ती कामे कशी होतात याचे प्रत्यक्ष अनुभव नवीन टाकीत पाणी भरून केलेल्या टेस्टिंगच्या वेळी कशाप्रकारे याच्या रिंगातून व स्लॅब मधून पाणी गळायला लागल्याचे चित्र दिसून आले हे दृश्य पाहून कामाचा दर्जा कसा असेल याची प्रचिती सर्वांना आलेलीच आहे.

निव्वळ कामात भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या हेतुने पिदूरकरकडे सदर टाकीचे काम सोपविण्यात आले.तसेच याला सिव्हिल कामाची एमबी बनविण्याचे अधिकार नसतांनाही त्याने स्वतः वाढीव एमबी बनविली व त्यानुसारच संबंधित ठेकेदाराला आरए बिल दिले.असे आरोप करत याची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक डोहे व मोरे यांनी निवेदनाद्वारे केली होती.याविषयी जिल्हाधिकारी यांनी समितीचे पदसिद्ध अधिकारी राजूरा उपविभागीय अधिकारी एस.पी.खलाटे अध्यक्ष आणि गजानन भोयर मुख्याधिकारी न.प.वरोरा,अरविंद शेरकी कार्यकारी अभियंता महा.जिवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली असून उपरोक्त चौकशी समितीने तातडीने तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मुद्देनिहाय सविस्तर चौकशी करावी व केलेल्या चौकशीचा अहवाल आपले स्वयंपष्ट अभीप्रायासह तात्काळ सादर  करावा असे आदेश दिले आहे.सदर प्रकरणी निष्पक्ष,निस्वार्थपणे चौकशी होणार अशी अपेक्षा तक्रारदारांनी व्यक्त केली असून चौकशी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...