Home / चंद्रपूर - जिल्हा / पूर बाधित क्षेत्रात...

चंद्रपूर - जिल्हा

पूर बाधित क्षेत्रात मोडणाऱ्या रणमोचन गावाचा पुनर्वसनाचा मुद्दा आता पूर्ण होईल काय ? मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून अपेक्षा.

पूर बाधित क्षेत्रात मोडणाऱ्या रणमोचन गावाचा पुनर्वसनाचा मुद्दा आता पूर्ण होईल काय ? मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून अपेक्षा.

ब्रह्मपुरी : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसे गावाजवळ वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पाचा भूमिपूजन शुभारंभ पाच-सहा दशका अगोदर सुरुवातीला लाडक्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला होता त्याच वेळी इंदिरा सागर प्रकल्प असे नामकरण करण्यात आले होते मात्र कालांतराने गोसीखुर्द प्रकल्प असे नामकरण देण्यात आले त्या अगोदर सन 1962,1965, मध्ये हा धरण पूर्णत्वास आला नसतानासुद्धा ह्याच वैनगंगा नदीला महापूर येऊन अनेक घरांची पडझड झाली होती त्यात अनेक कुटुंब उघड्यावर पडले होते मात्र त्यानंतर शासनाने नदीकाठा लगत असलेल्या अनेक गावातील कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे शासनाकडून आश्वासन दिले गेले होते त्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुतांशी गावांपैकी लाडज रुई निलज पाचगाव यांचे जवळपास 1972-1974 मध्ये पुनर्वसन करण्यात आले त्यानंतर गोसीखुर्द प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 1994 मध्ये धरण तुडूंब भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुन्हा वैनगंगा नदीला महापूर आला होता त्यावेळीही पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना सुद्धा त्यावेळचे तत्कालीन (मंत्री ) तथा खासदार विलास मुत्तेमवार यांनी रनमोचन गावाचा पुनर्वसनाचा हा मुद्दा सुद्धा रेटून धरला होता पण मात्र त्यात पाणी कुठे? मुरले काही कळले नाही शिवाय त्यावेळीसुद्धा लोकांचे बेघर झालेत केवळ ताट- व्यांच्या व ताडपत्रीने ,(तंबू) बांधलेल्या घरात लोकांना बरेच दिवस काढावे लागले मात्र त्यानंतर कोणीच राजकीय नेते मंडळी पुढे सरसावले नाही आणि पुन्हा एकदा 29 व 30 ऑगस्ट 20 20 रोजी मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी काठालगत असलेल्या गावांना कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा गोसीखुर्द प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पुन्हा महापूर आला त्यातही अनेक घरांची पडझड होऊन सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रण मोचन गावाला भेट देऊन पुनर्वसनाचा मुद्दा पूर्ण करण्याचे आश्वासन जरी दिले असले तरी खुद्ध ते त्या खात्याचे मंत्री असताना तरी नेतृत्वात आता पुनर्वसन होईल अशी अपेक्षा? रन मोचन गाव वासियांना आहे.

त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा रणमोचन गावाला भेट दिली असतांना ग्रामस्थातर्फे त्यांना सुद्धा पुनर्वसन सबंधित निवेदन देण्यात आले गेल्या सात-आठ दिवस आगोदर रणमोचन येथील सरपंच नीलिमा नीलकंठ राऊत यांनी यासंदर्भात मंत्री विजय वडेट्टीवार यांना पुनर्वसनाच्या संबंधाने निवेदन सुद्धा दिले गेले आहे त्यामुळे आता तरी रनमोचन गावाचे पुनर्वसन होईल अशी अपेक्षा जनतेला आहे

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...