Home / महाराष्ट्र / परिस्थितीचा आढावा घेऊन...

महाराष्ट्र

परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउन संदर्भात निर्णय घेणार - अजित पवार

परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउन संदर्भात निर्णय घेणार - अजित पवार

भारतीय वार्ता  (प्रतिनिधी) :  दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाउनचा मार्ग स्वीकारील का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  येत्या 8 ते 10 दिवसात परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर लॉकडाउनबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.


ते म्हणाले, दिवाळीच्या वेळी बरीच गर्दी होती. गणेश चतुर्थी दरम्यानही अशीच परिस्थिती होती. आम्ही संबंधित विभागांशी बोलत आहोत. आम्ही पुढील 8-10 दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ आणि नंतर लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल. दिवाळीच्या वेळी लोकांनी अशी गर्दी केली जणू या गर्दीमुळे कोरोना मरणार आहे. राज्य सरकारने एक नियमावली तयार केली आहे, ज्यामध्ये शिक्षकांच्या टेस्टिंगसह इतर नियम आहेत. याउलट महापालिका आणि जिल्हा परिषदा निर्णय घेऊ शकतात. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, नागरिक पॅनिक होतील असे मी बोलणार नाही. पाच सहा दिवसांत आढावा घेऊ.
मी एक महिना रुग्णालयात असल्याने वीज बिलांबाबत जास्त माहिती नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली हे देखील मला माहिती नाही. ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही, त्यांनी काय टीका करावी. शरद पवार दिल्लीतले नेते आहेत. विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर दिली.
काँग्रेससोबत दुजाभाव होत असल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर ते म्हणाले, की गरज बघून वाटप होते, मी काही आज मंत्री झालेलो नाही. कार्तिकी एकादशीबाबत निर्णय राज्य सरकार घेईल. उपमुख्यमंत्री जातात किंवा सिनिअर जातात. मास्कची दिल्लीत जास्त कारवाई झाली आहे. आपल्याकडे कमी झाली, दिवाळीत आनंद होता म्हणून कारवाई केली नाही, आता करू, पाच सहा दिवसांत लॉकडाउन बाबत सगळं चित्र स्पष्ट होईल. आचारसंहितेमुळे मला अधिकार्‍यांची बैठक घेता आली नाही. मात्र, लोकांना विनंती आहे, 500 रुपये न भरता मास्क वापरावे, एक तारखेनंतर मी बैठक घेणार आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...