वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर, दि. 27 नोव्हेंबर : धार्मिक तिर्थस्थळे ही माणसांना जोडणारी ठिकाणे असून विविध जातीधर्माचे नागरीक दर्शनाला एकत्र येत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये एकोपा निर्माण होण्यास मदत होते. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील अंबिका माता व एल्लमा मातेचे देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. येथे सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन करतांना मनापासून आनंद होत आहे. भाविकांसाठी अशा धार्मिक पर्यटन क्षेत्राचा विकास करून नागरिकांना येथे पर्यटनाच्यादृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ, असे विचार मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
गुंजेवाही येथे परिसरातील अंतर्गत रस्ता व सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रूपा सुरकार, पंचायत समिती सदस्य राहुल पोरेड्डीवार, गुंजेवाहीचे सरपंच वसंता टेकाम, अंबिका माता देवस्थानचे अध्यक्ष सुरेश गुणशेट्टीवार, पोलिस पाटील वंदना चन्नावार, विरेंद्र जयस्वाल, चंद्रशेखर चन्ने, सीमा सहारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता माधवराव गावड, सहाय्यक अभियंता क्षितिजा शिंदे आदी उपस्थित होते.
चंद्रपूरजवळ वर्धा – पैनगंगा नदीच्या संगमावर असलेल्या वढा तिर्थक्षेत्राचा विकास करण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, वढा येथे ‘प्रती पंढरी’ साक्षात उभी करण्याचा आपला मानस आहे. पर्यटनाच्यादृष्टीने आकर्षक असलेल्या धार्मिक स्थळांना विकसीत करणे, त्याचा दर्जा वाढविणे याला आपले प्राधान्य आहे. गुंजेवाही येथील अंबिका माता देवस्थानातसुध्दा अनेक भाविक येत असतात. त्यामुळे येथील परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी अतिरिक्त 50 लक्ष रुपयाचा निधी देऊ. तसेच पुढील वर्षी एक कोटीची तरतूद करण्यात येईल. लोकांच्या कायम स्मरणात राहील असा विकास करून दाखवू. मात्र त्यासाठी स्थानिकांनीसुध्दा आग्रही असले पाहिजे. तसेच आपल्या परिसराचा विकास व्हावा, यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसला पाहिजे.
कोरोनामुळे काही काळ विकासात्मक कामाची गती संथ होती. मात्र, आता विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने निधी उपलब्ध करून देण्याची गावकऱ्यांची मागणी होती. सावरगाव- मरेगाव- गुंजेवाही- पवनार- टेकरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 6 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. तसेच गुंजेवाही येथील अंबिका माता देवस्थान व येल्लमा देवी परिसरातील सामाजिक सभागृहासाठी 30 लक्ष रुपये मंजूर झाले आहे. या दोन्ही कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. येथे तयार होणाऱ्या सामाजिक सभागृहात 500 ते 700 लोकांच्या क्षमतेचे समारंभ, धार्मिक कार्यक्रम इत्यादी होऊ शकेल. सर्व सोयीसुविधा युक्त सभागृह बांधण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे. तसेच सभागृह बांधून पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सिंदेवाही तालुक्यातील पवनचक आणि कोटा येथे काँक्रीट रस्त्याचे भुमिपूजन (प्रत्येकी 10 लक्ष रुपये), गुंजेवाही येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन (30 लक्ष), सावरगाटा - मरेगांव - गुंजेवाही - पवनार - टेकरी रस्ता दुरुस्ती (6 कोटी) कामाचे भुमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पवनाचकचे सरपंच श्रीरंग चौधरी, कोटाच्या उपसरपंचा शलिनी गुरुनुले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...