खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
नयन मडावी (प्रतिनिधी): अनेक कलाकार जमिनीशी जुळून काम करतात तर अनेक कलाकार आपले लक जमवण्याकरिता मुंबई ला जातात. गावगाड्याडून मुंबईला जाणाऱ्या कलाकारांना कधी आशा तर कधी निराशा मिळत असते. लॉक डाऊन मधे तर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यातही जे नाट्य कलावंत आहे, ज्यांचे पाय नेहमी वगेवेगळ्या नाटककारांच्या नाटकासाठी नाचत असते अश्या कलाकारांचे पाय या संपूर्ण लॉक डाऊन ने बांधून ठेवले होते.
मग लॉक डाऊन नंतर कलाकारांची वास्तविकता काय आहे हेच बघण्याकरिता भारतीय वार्ता चे सपादक दत्ता बोबडे हे राजेश सोयाम यांच्या भेटीला गेले. राजेश हा मुळचां शींदोला गाव ता. वणी जी. यवतमाळ येथील रहिवासी आहे. दत्ता बोबडे सपादक यांनी कलारांची सध्याची सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजेश सोयाम् यांनी सांगितले की हल्लीच मुंबई विद्यापीठातून ड्रामा या विषयातून त्यानी मास्टर्स पूर्ण केलं आहे व आता मुंबई विद्यापीठातून पी. एचडी. करण्याकरिता त्याने प्रवेश परीक्षा देखील पास केली आहे. आणि आता तो 2022 पासून स्वतःच्या संस्कृतीचा विषय घेत त्यावर पी. एचडी. देखील करणार आहे. यापूर्वी चंद्रपूर ला शिकत असताना त्यानी अनेक छोटी मोठी नाटके केली आहेत.
बल्लारपूर नगरपरिषद तर्फे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पथनाट्य, चंद्रपूर म.न.पा. तर्फे प्लास्टिक बंदी व स्वछता अभियान नाटकाचा कार्यक्रम , संजीवनी , हौसी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग , भारतीय डिजिटल पार्टी मुंबई या प्रसिद्ध चॅनल सोबत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात विनोदी अभिनया मार्फत आपला संदेश पोहचवला. कलर्स मराठी वर त्यानी स्वामींनी या मालिकेत भूमिका देखील केली आहे. आणि जमेची बाब म्हणजे कला क्षेत्रातच आपल्या संस्कृतीला सामोरे आणण्याचा प्रयत्न तो आता पी.एचडी. मार्फत करणार आहे.
अश्या गावातून संबंधित कलाकारांना योग्य प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले पाहिजे म्हणून दत्ता बोबडे यांनी राजेश सोयाम यांच्याशी त्यांच्या राहते घरी तब्बल दोन तास चर्चा केली. उपस्थित भारतीय वार्ता पोर्टलचे रिपोटर नयन मडावी यानी जय जिजाऊ हे मा.म. देशमुख लिखित पुस्तक देखील भेट दिले. त्यावेळी उपस्थित त्यांचे वडील श्री. पुरुषोत्तम सोयाम् , आई मायाबाई सोयाम , लहान भाऊ विशाल सोयाम, ज्ञानेश्वर ठाकरे, नयन मडावी व भारतीय वार्ताचे पोर्टल चे मार्गदर्शक श्री. दत्ता बोबडे उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...