Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / शेतामधुन बैलबंडीत कापुस...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

शेतामधुन बैलबंडीत कापुस घरी घेऊन येताना शेत पांदनरस्ता चिखलाने खराब असल्याने बैल चिखलात फसुन जागीच ठार.

शेतामधुन बैलबंडीत कापुस घरी  घेऊन येताना शेत पांदनरस्ता चिखलाने खराब असल्याने बैल चिखलात फसुन जागीच  ठार.

बोरी (गदाजी) येथील घटना, शेतकऱ्याचे झालेले आर्थिक नुकसान शासनाने भरपाई करून द्यावे ही संबंधित शेतकऱ्याची मागणी

आशिष साबरे(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मारेगाव: तालुक्यातील बोरी(बु) म्हनजेच बोरी गदाजी येथील शेतकरी श्री भैय्याजी चौधरी यांच्या शेतातून काल दिनांक 30 ऑक्टोबर राजी सायंकाळी कापूस घेऊन येणारी बैलबंडी चिखलाने माखलेल्या रस्त्यात फसल्यामुळे, एका बैलाचा चिखलात फसून जागीच मृत्यू झाला.  एका मुक्या प्राण्याचा अशा प्रकारे झालेल्या मृत्यूमुळे संबंधित शेतकऱ्याला दुःखाचा हादराच बसला आहे. बैल हे शेतकऱ्यांना खूप महत्वाचे असतात. बैलाशिवाय या तंत्रज्ञानाच्या काळात सुद्धा शेती करणे शक्य होत नाही. बोरी गदाजी येथील शेत पांदनरस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने गावातील शेतकऱ्यांनी 26 ऑक्टोबर रोजी मा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना शेत पांदनरस्ते दुरुस्त करून देण्यासाठी निवेदन दिले होते.या घटणेला 4 दिवस झाले असतांनाच काल खराब पांदनस्त्यामुळे एका बैलाचा हकनाक जीव गेला ही खरंच दुःखाची बाब आहे. एक बैल मरण पावल्याने संबंधित शेतकऱ्याचे भावनिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे.तेव्हा शासनाने आर्थिक भरपाई करावी अशी संबंधित शेतकऱ्याची मागणी आहे. तसेच मा आमदारांनी लवकरात लवकर गावातील सर्व शेत पांदनरस्ते दुरुस्त करून घ्यावे अन्यथा पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्या शिवाय राहणार नाही.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...