Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / सत्ताधाऱ्यांनी दारू...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

सत्ताधाऱ्यांनी दारू दुकानाच्या ना हरकत साठी कसली कंबर..!

सत्ताधाऱ्यांनी दारू दुकानाच्या ना हरकत साठी कसली कंबर..!

विरोधकांनी उधळून लावले ठराव..!

मारोती डोंगे (कोरपना प्रतिनिधी) गडचांदूर:- गडचांदूर नगरपरिषदची 9 डिसेंबर 2021 रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. त्यामध्ये इतर विषयांसह 14 वा विषय स्थलांतरित देशी दारू दुकानाचा होता. यावर विचार विनियम करून निर्णय घेतला जाणार होता.मात्र त्यादिवशी कांग्रेसचे दोन नगरसेवक अनुपस्थित असल्याने ठरावाला बहुमत कमी पडेल कदाचित या भितीने 10 विषय घेऊन नगराध्यक्षांनी सदर सभा अचानकपणे तहकुब केल्याचे विरोधी नगरसेवकांचे म्हणणे होते. ती तहकुब सभा 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली. या सभेत सर्व सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आवर्जून हजेरी लावली.आज दारूचा विषय सभेला आहे व सत्ताधारी नाहरकत  देणार अशी वाऱ्या सारखी शहरात चर्चा पसरली व असंख्य महिला नगर परिषद समोर उभे राहुन नारे बाजी करीत असल्याने व सभागृहात विरोधी नगरसेवकांनी नाहरकत न देण्याबाबत ठाम भूमिका घेतल्याने , या  दरम्यान अनेक घडामोडी घडल्या.तरीपण दारूच्या विषयावर विरोधी नगरसेवकांचा विरोध व आक्रमक भूमिका लक्षात घेत गुप्त मतदान घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष यांनी घेतला. यामध्ये दारू दुकानाच्या समर्थनार्थ 6 आणि विरोधात 11 व 1 मत अवैध ठरल्याने दारू दुकानाचा ठराव नामंजूर करण्यात आला.

 सविस्तर असे की गडचांदूर नगरपरिषदेत कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसची सत्ता आहे.यापूर्वी सुद्धा लांजेकर यांच्या स्थलांतरित देशी दारू दुकानासाठी विशेष सभा बोलावण्यात आली आणि विरोधी नगरसेवक व नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर बहुमताने ठराव मंजूर करून ना-हरकत देण्यात आले. मात्र या दुसऱ्या नवीन दुकानाबाबत काही कारणाने सत्ताधाऱ्यांमध्ये वादविवाद व नाराजी होती. त्यामुळे याला ना-हरकत देण्यासाठी पूर्वी पासूनच यांच्यात एकमत नसल्यामुळे 9 डिसेंबरची सभा तहकूब करावी लागली असे विरोधी नगरसेवकांचे म्हणणे आहे.10 जानेवारी रोजी सभा घेण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले व त्यांनी आपापल्या नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने राहण्यास सांगितल्याची माहिती आहे. असे असताना शेवटी विरोधी नगरसेवकांनी सभेत सदर ठरावाला मंजूर होऊ दिले नाही हे मात्र विशेष. या नवीन दारू दुकानाला विरोध दर्शवण्यासाठी सभेच्या दिवशी संबंधित परिसरातील महिला स्थानिक नगरपरिषद समोर ठिय्या मांडून बसले होते. ठराव नामंजूर झाल्यानंतर महिलांनी या विषयी समाधान व्यक्त करत दारूच्या विरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांचे आभार मानले आहे. काही का असेना शेवटी बहुचर्चित या विषयाला पूर्णविराम मिळाला असून "विरोध झाला मोठा, पैसा झाला खोटा" अशी उपहासात्मक चर्चा सध्या शहरात ऐकायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...