Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / बि एस एफ जवानाचे येनक...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

बि एस एफ जवानाचे येनक (हनुमान नगर)येथे जंगी स्वागत..!

बि एस एफ जवानाचे येनक (हनुमान नगर)येथे जंगी स्वागत..!

राजु गोरे (शिंदोला) :- यवतमाळ जिल्हयातील तालुका -वणी अंतर्गत येत असलेल्या येनक ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या हनुमान नगर येतील रहिवासी जवान संतोष महादेव बानकर हा बि एस एफ जवान असून तो दि.30 सप्टेंबर 2021 रोजी पश्चिम रेजिमेंट ( एच सि रँक )पदावरून निवृत्ती झाल्याने जन्म गावी संतोषचा ग्रामवासियांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला.    

 संतोष चा  सेवा कार्यकाल संपल्याने तो दि.6 ऑक्टोबर रोजी  नायगाव बु येथील मामे (हरिदास नागपुरे )यांच्या गावी भेटी नतंर साय.5-00 वाजता गावी आल्यावर  गाव वेशीवर फटाक्याची आतिष बाजी करून, महिलानी संतोषला अक्षवन्त करून मान सन्मान करीत तिरंगी रंगात सजवलेल्या वाहणातून गाव  प्रदक्षिणा करीत देश भक्ती गाणे वाजवीत हनुमान मंदिरराजवळ हनुमाननगर रंगमंच येथे सम्पूर्ण गावाने आणले। त्यानंतर  पत्नी, आई वडिला समवेत अध्यक्ष स्थानी असलेल्या सरपंच सौ.कल्पना रमेश टोंगे, संजय निखाडे सदस्य पं. स, अनिल गारघाटे उपसरपंच, सौ. सुप्रिया पडीले, सौ. सुषमा ढवळे, कु. ज्योती उईके, दत्ता बोबडे भारतीय वार्ता संपादक, निर्भीड ग्रामीण पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष याच्या उपस्थितीत प्रथम शिवाजी राजे व सुभाषचंद्र बोस याच्या फोटोना दीप प्रजवलीत करून माल्याअर्पण करून संतोषचा पत्नी, आई वडील व मुलगा समवेत शाल श्रीफळ, शिवाजी राजेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित मान्यवरानी गावाच्या तरुणांनी संतोषचा आदर्श ठेऊन देश सेवा करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा । संतोषच्या कार्याचा आदर्श आपल्या समोर असल्याने तो अवघड असा मार्ग नाही, तो स्वीकार करा असा संदेश दिला.यावेळी उपस्थितीत जनसमूहाणी संतोषला पेढा भरवूंन संतोषचे तोंड गोळ केले, यावेळी संतोष यानी सेवा काळ व बि एस एफ याचे कर्तव्य कसे असते ते भारतीय वार्ता पोर्टलसी सांगताना के एफ रुस्तमजी याच्या नेतृत्वात 1डिसेंबर 1965बटालीयनची स्थापना झाली असून यात 186 बटालियण आहे, त्यात 2.4 लाख जवान देशातील सीमावर्ती भागाची सुरक्षा करून अवैध प्रवासी, तस्करी, आपरेशन, संचार व सूचना तकनिक, इजिनियरींग तकनिक व प्रशाशन पासुन कानूनी चिकित्स्क व हत्याराच्या संबंधित सहाय्य्क प्राप्त आहे.

हे बटालियन पश्चिम भारत, बागलादेश, कलकत्ता, गु्वाहाटी, पटणा मध्ये स्थापित आहे, हया बटालियनने आपरेशन ब्लु स्टार व आपरेशन ब्लक थंडर, बि एस एफ 1999मध्ये कारगिल युद्धात खुप मोठी भूमिका निभावली आहे, मोहरी नदी ही बांगलादेश व भारत हया देशाच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने सीमा वाद कायम ठेवत असल्याने बि एस एफचे काम वाढत असते,4 हजार किलो मीटर गोवाटी ते बागलादेश सीमावर्ती भाग असून बि एस एफ जवान सज्ज् राहून आपले देशा प्रति कर्तव्य पूर्ण करीत आहे. माझ्या सेवेत 6 वेळ माझी सेवा वेगवेगळ्या राज्यात झाली असून 20 वर्ष 6 महिने 18 दिवस मला माझ्या देशाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले .हया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मेश्राम, आभार -रवींद्र पागूळ यानी केले हया कार्यक्रमाचे आयोजन राजु गोरे, बळीराजा एकता बचत गट हनुमान नगर व समस्त गावकरी सहकार्याने केले। सर्वानी अथक प्रयत्न  घेऊन साजरा केलेला भारतीय सैन्यतिल जवानाप्रती असलेला आपुलकीचा सोहळा सर्वाना प्रेरणा देणारा होता .

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...