खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजपच्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी चे गुंड व त्यांच्या मुलगा असलेल्या वाहनांच्या ताफ्याने मागून शेतकऱ्यांच्या अंगावर वाहून चालवून चार शेतकरी व एक पत्रकाराला चिरडून ठार मारले. ह्या शहीद शेतकरी व पत्रकारांचे अस्थीकलश संपूर्ण महाराष्ट्र भर यात्रा काढून प्रत्येक जिल्ह्यात अभिवादन व सभा घेण्यात येत आहेत. ह्या अनुषंगाने अस्थीकलशाचे जंगी स्वागत यवतमाळ जिल्ह्यातील वणी, पाटणबोरी व मारेगाव येथे करण्यात येऊन ह्या शहिद शेतकरी अस्थीकलशाला अभिवादन करण्यात आले.
पुणे येथील महात्मा फुले वाड्यातून दि. २७ ऑक्टोबर ला निघालेली अस्थीकलश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात फिरून मुबई येथे हुतात्मा चौकात समुद्रात विसर्जित करण्यात येणार आहे. ही अस्थीकलश यात्रा ही शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, तीन काळे कृषी रद्द करण्यासाठी, प्रस्तावित वीज कायदा रद्द करण्यासाठी, कृषी पिकाला हमी भावाचा कायदा करण्यासाठी आहे. त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील बाजार चौकात, वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व मारेगाव येथील शहीद भगतसिंग चौकात जंगी स्वागत करण्यात येऊन अभिवादन करून सभा घेण्यात आली.
या तीनही ठिकाणी झालेल्या स्वागत व अभिवादन सभेत अस्थीकलश यात्रेत सोबत असलेले किसान सभेचे कॉ. जितेंद्र चोपडे, माकपचे कॉ. शंकरराव दानव, कॉ. दिलीप परचाके, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. चंद्रशेखर सिडाम, वंचित चे दिलीप भोयर, मंगल तेलंग, मिलिंद पाटील, लढा शेतकरी हक्काचे रुद्रा कुचनकर, शेतकरी संघटनेचे ओमदेव कनाके, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे यांनी मार्गदर्शन केले.
या यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या शहीद शेतकरी अस्थीकलश यात्रेला यशस्वी करण्यासाठी सर्व कॉम्रेड किसन मोहूरले, खुशालराव सोयाम, रामभाऊ जिड्डेवार, रवी जाधव, संदीप सुरपाम, प्रशांत लसंते, भाऊराव टेकाम, उरकुडा गेडाम, सुरेखा बिरकुलवर, गजानन ताकसांडे, कवडू चांदेकर, सुधाकर सोनटक्के, नंदू बोबडे,शंकर भगत, सुदर्शन टेकाम, सुरेंद्र आडे, अशोक ढोले, संजय वालकोंडे,आदींनी परिश्रम घेतले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...