वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आ. मुनगंटीवार यांनी घेतला आढावा घेतला
चंद्रपूर: माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला. मुल तालुक्यातील २४ गावे, पोंभुर्णा तालुक्यातील १५ गावे तर बल्लारपूर तालुक्यातील १८ गावे अंतर्भूत असलेल्या सदर योजनेचा विस्तृत आढावा आ. मुनगंटीवार यांनी घेतला.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान, जिल्हा परिषद सदस्य राहूल संतोषवार, अॅड. हरीश गेडाम, वैशाली बुध्दलवार, गौतम निमगडे, रामपाल सिंह, पंचायत समिती पोंभुर्णांच्या सभापती अलका आत्राम, पंचायत समिती चंद्रपूर सभापती केमा रायपुरे, रमेश पिपरे, नामदेव आसुटकर, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा (जि.प.) व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी या सर्व कामांची प्रशासकीय मान्यता कधी मिळाली, त्याची किंमत किती , टेंडर कधी झाले, काम पूर्ण करण्याचा कालावधी किती होता, त्याला उशीर झाला असल्यास काही दंड ठोठावला कां व तो वसुल झाला कां असे अनेक प्रश्न आ. मुनगंटीवार यांनी अधिका-यांना विचारले. मुल तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणी ऑक्टोबर २०२१ पर्यंत, पोंभुर्णा तालुक्यातील काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले . कामांच्या गुणवत्ते बाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही असे बजावत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल पुरवठा होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...