Home / महाराष्ट्र / जलसंपदामंत्री जयंत...

महाराष्ट्र

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वणी चे उद्दोजक रमेश राजूरकर यांच्या घरी घेतलेल्या भेटीने राजकीय गणीत तापले..

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वणी चे उद्दोजक रमेश राजूरकर यांच्या घरी घेतलेल्या भेटीने राजकीय गणीत तापले..

मोठ्या नेत्याच्या भेटीने राजकीय खलबते सूरू, वणी व वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात राजकीय चर्चेला आले उधाण..

वणी: वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अगदी पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन निवडणूक लढवीतांना तब्बल ३५ हजार मतदान घेवून राजकीय क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करणारे यशस्वी उद्दोजक रमेश राजूरकर यांचा वणी मध्ये मोठा उद्योग असुन त्यांची पकड वणीत पन चागली आहे. या दोन्ही गोष्टी जमेच्या बाजू असल्याने राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यात असताना त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट नुकतीच घेतल्याने वरोरा भद्रावती वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय चर्चेला उधाण आले आहे आणि जणू रमेश राजूरकर हे मनसे सोडून राष्ट्रवादी पक्षात जातील अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे, मात्र ही एक सदिच्छा भेट होती असे रमेश राजूरकर यांच्या कडून जाहीर करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा करणाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे चित्र आहे.

जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते.2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. ते 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.त्यांचे वडील स्व.राजारामबापू पाटील हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते.जयंत पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहे.जयंत पाटील हे सध्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री आहेत.

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे छोट्या छोट्या आणि नावीन्यपूर्ण असलेल्या गोष्टीचा बारकाईने विचार करतात त्यातच त्यांना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांनी संगितले की आपल्या क्षेत्रात असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वतःची सरकारी नौकरी सोडून उद्दोजक बनायचं ठरवलं आणि आज ते यशस्वी उद्दोजक आहे शिवाय आता ते तरुण बेरोजगारांना स्वतःचा ऊद्दोग कसा करायचा याचे मार्गदर्शन करताहेत व त्याची वणीत पन पकड आहे, त्यामुळे राज्याचे जलसंपदामंत्रीयांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि तब्बल अर्धा तास वरोरा येथे रमेश राजूरकर यांच्या रोजगार संबंधातील विविध उपक्रमाची माहिती घेतली,या चर्चेत तुम्हाला हवी ती मदत तूम्हच्या रोजगाराच्या उपक्रमास नक्कीच देऊ अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्यांना दिली. शून्यातून विश्व निर्माण करण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या सर्व तरुण बेरोजगारांनी यशस्वी उद्दोजक रमेश राजूरकर यांचा कित्ता गिरवला तर नवी उद्दोजक पिढी वरोरा भद्रावती, वणी विधानसभा क्षेत्रात निर्माण होऊ शकते अशी अपेक्षा या निमित्याने निर्माण होत आहे.

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...