खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय-वार्ता (वणी):- गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीने
जनसामान्यांचे जगणे कठीण करून
टाकले होते, विविध अफवा, ग्रामीण
भागात वाढणारा कोरोना यामुळे गाव
खेड्यातील नागरिक भयभीत होऊन
खचलेला होता. अशा संकटाच्या काळात
"गाव हेच कुटुंब" ही संकल्पना उराशी
बाळगत धीर देण्याचे काम जीवाची पर्वा न
करता ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी
केले. यात काही योद्ध्यांना प्राणाची
आहुती द्यावी लागली. त्या सर्व कोरोना
योध्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळ्याचे
आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण
करण्याचे आयोजन गुरुदेव अर्बन निधी
लिमिटेड च्या वतीने दि.२२ नोव्हेंबर रोजी
सकाळी ११ वाजता येथील शेतकरी मंदिर
येथे करण्यात आले आहे. अशी माहिती
दि.१९ नोव्हेंबर ला वसंत जिनिंग
मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत
प्रा.टिकाराम कोंगरे यांनी दिली. यावेळी
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद
वासेकर, रुद्रा कुचनकर व अँड, रुपेश
ठाकरे उपस्थित होते.
यावेळी प्रा.टिकाराम कोंगरे यांनी सांगितले
की, सदर कार्यक्रमाला खा.बाळू उर्फ सुरेश
धानोरकर, जिल्हा कांग्रेस कमिटीचे
अध्यक्ष आ.वजाहत मिर्जा,
माजी आमदार
वामनराव कासावर, वसंत जिनिंगचे
अध्यक्ष देविदास काळे,
महाराष्ट्र प्रदेश
इंटक चे अध्यक्ष विनोद पटोले, कृषी उत्पन्न
बाजार समिती मारेगावचे सभापती नरेंद्र
ठाकरे, जि.प. सदस्य अरुणा खंडाळकर
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वेळेस पाटोदा गावाची ओळख
आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण राज्यांला करून
देणारे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील
तालुक्यातील उपस्थित ग्रामपंचायत
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
तर कोरोना काळात गाव
पातळीवर जीवाची पर्वा न करता
जनसामान्यांना संरक्षण देतांना कोरोना
संसर्ग झाल्याने हुतात्म्य पत्करावे
लागलेल्या तालुक्यातील चिखलगाव,
बोर्डा, बोरगाव, मारेगाव (कोरंबी) येथील
सरपंच, उपसरपंच यांना भावपूर्ण
श्रद्धांजली व कुटुंबियांचे सांत्वन
मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या
भावस्पर्शी कार्यक्रमाला तालुक्यातील
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य व
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहावे असे आव्हान कार्यक्रमाचे
आयोजक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष,
प्रा. टिकाराम कोंगरे यांनी पत्रकार
परिषदेत केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...