*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
वणीत महसूल चे काम बंद आंदोलन
वणी : सद्या जिल्ह्यामध्ये अनेक तालूक्यात रेती चोरीच्या घटना घडत असतांना दिसत आहे. परिणामी उमरखेड तालूक्यात होत असलेल्या रेती चोरीला आळा घालण्याकरीता गेलेले नायब तहसीलदार वैभव पवार व गजानन सूरोशे मंन्याळी तलाटी यांचेवर दि.२३ जानेवारी २०२१ ला रात्रीचे अंदाजे ११ वाजताचे दरम्यान रेती माफीयांनी चाकूने प्राण घातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश चव्हाण सह बिर्ला नावाचा व्यक्ती अजून पर्यंत फरार आहे. त्या आरोपींना २६ जानेवारी पर्यंत अटक करण्यात यावी अन्यथा २६ जानेवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनांनी दिला होता. परंतु २६ जानेवारी २०२१ पर्यंत सबंधीत रेती माफीयांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामूळे दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी वणीत कामबंद आंदोलन करण्यात आले आहे.
सदर घटनेमुळे जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण झाले असून रेती माफीयांकडुन या प्रकारचे जिवघेणे हल्ले चालूच आहेत.यास प्रतिबंध म्हणुन कार्यवाहीचे वेळेस कोणतेही संरक्षण वेळीच प्राप्त होत नाही. त्यामुळे महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण झाली आहे.संबंधित गुन्हेगारांवर संघटीत गुन्हेगारी कायदा( म.को.का.) अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई होत नसल्यामुळे आज दि.२७ जानेवारीला तहसील कार्यालय वणी येथे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यानंतरही गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई न झाल्यास सर्व संघटना एकत्र येऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असा इशारा येथिल उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांचे मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी तहसीलदार, नायब तहसिलदार संघटनेचे उपाध्यक्ष महेश रामगुंडे, महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रविण नागपूरे,मंडल अधिकारी संघटनेचे नितीन बांगडे, ना.तहसिलदार विवेक पांडे, अशोक ब्राम्हणवाडे ना.तह.नि, रविन्द्र कापसेकर ना.तह, मंडल अधिकारी एम.जी.मडावी, महेंद्र देशपांडे, आर.आर. इंगोले,जि.ए.कुमरे, जि.एन.देठे, बाळासाहेब खैरे,डि.एन.आत्राम, यांचेसह के.ए.चेडे,डि.आर.चपरीया,पटकोटवार,पळवेकर,संध्या गोखरे,रोटे, संगिता तामगाडगे, रेखा मोडले, प्रभा एडलावार,मारा गेडाम, आसुटकर,पथाडे, मडावी, त्रिपत्रीवार ईत्यादींसह कर्मचारी उपस्थित होते.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...